मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड हे कार्यकर्त्यांसह शताब्दी हॉस्पिटलचे गेट क्रमांक 3 उघडण्यासाठी प्रतिभा पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते. तेव्हा आरपीआयच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाली. रुग्णालयातील महिलांच्या स्वच्छतागृहाबाहेर शेकडो दारूच्या बाटल्या पडून आहेत, याविरोधात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी शताब्दी रुग्णालयाच्या आवारात मोर्चा काढला. महिला प्रसाधनगृहाबाहेर दारू बाटली आली कुठून आणि कोण वापरते, अशी विचारणा आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आंबेडकर नावाची बदनामी: बाबासाहेब आंबेडकर नावाच्या या रुग्णालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासन करत आहे. कोट्यवधींचे बजेट असलेल्या या रुग्णालयात गेटपासून ते आतील एकरपर्यंत शेकडो सुरक्षारक्षक तैनात आहेत. मात्र असे असतानाही रुग्णालयाच्या आतून शेकडो दारूच्या बाटल्या आल्या कोठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या माहितीनंतर जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड रुग्णालयाच्या डीन प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन जाब विचारला. डीन यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. पण त्या तपास करतील असेही सांगितले. गायकवाड यांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी हजर असलेल्या कांदिवली पोलीस ठाण्याच्या पीआय दीपशिखा वारे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची बदनामी करणार्याला सोडणार नाही, असे सांगून या विषयाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
बाटल्या मिळाल्याने गोंधळ: शताब्दी हॉस्पिटलमध्ये बिअर आणि दारूच्या बाटल्या मिळाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. रमेश गायकवाड म्हणाले की, रुग्णाच्या नातेवाईकाला या रुग्णालयात प्रवेश दिला जात नसताना दारू आणि बिअरच्या बाटल्या कुठून ? येथील डॉक्टर आणि परिचारिका दारू पितात का याचा तपास व्हायला हवा. तर शताब्दी हॉस्पिटलच्या डीन डॉ प्रतिमा पाटील यांनी सांगितले की, आम्ही अहवाल आल्यानंतर तपास करू.
रुग्णालय आहे की दारूचा अड्डा: या आधीही नाशिक येथे अशीच एक घटना घडली होती. येवल्याचा उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य तसेच दारूच्या बाटल्या पडले होते. संबंधित प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. या रुग्णाला परिसरात दारूच्या पार्ट्या होतात की काय? हाच मोठा प्रश्न रुग्णालयातील नातेवाईकांनी उपस्थित केला होता. येवला शहरातील रुग्णांना बाहेर जावे लागू नये याकरिता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपजिल्हा रुग्णालय बांधले होते. रुग्णालय परिसरामध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या पडल्याचे चित्र दिसत होते. वारंवार या गोष्टी प्रशासनाकडे लक्षात आणून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या आरोप येथील नागरिकांनी केला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पॉकिट, गुटख्याच्या पुड्या पडल्याचे दिसत असून हे रुग्णालय आहे की दारूचा अड्डा असा मोठा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता.