मुंबई: 'आयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धा' ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत असून यंदा भारताकडे त्याचे यजमान पद आहे. भारतातील खेळपट्ट्यांवर आता जगभरातील खेळाडू आयपीएलच्या निमित्ताने खेळत असतात. मात्र, तरीही भारत आणि उपखंडातील खेळाडूंसाठी भारतातील खेळपट्ट्या ह्या अधिक फायदेशीर ठरू शकतात, असे मत सहवाग आणि मुरलीधरन यांनी यावेळी मांडले.
तरच भारत जिंकू शकतो: कोणत्याही खेळाडूची क्षमता आणि त्याची नैसर्गिक शैली ओळखून त्याला खेळ खेळू दिला पाहिजे. जर एखादा खेळाडू कमी चेंडूंमध्ये अधिक रन करण्यात वाकबगार असेल तर त्याला त्या पद्धतीने खेळू द्यायला पाहिजे. 2011च्या विश्वचषक जिंकलेल्या संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन होते. त्यांनी अतिशय मेहनत घेऊन सर्वांना कसे खेळावे हे सांगितले. तर विश्वचषकाच्या आधीपासूनच प्रत्येक सामना हा 'नॉक आउट' सामना आहे. याच दृष्टीने खेळाचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे प्रत्येक सामना आम्ही जिद्दीने आणि जीव तोडून खेळलो. त्यामुळेच विजय संपादित झाला जर विजयाची पुनरावृत्ती करायची असेल तर पुन्हा त्याच पद्धतीने खेळले पाहिजे. तरच विजय मिळू शकतो आणि हा विश्वचषक भारताच्या नावावर लागू शकतो, असे सेहवाग यांनी सांगितले.
15 ऑक्टोबर हा सर्वांत महत्त्वाचा दिवस: येत्या विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना हा 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात भारत आणि विश्वचषकातला एकही सामना पाकिस्तान विरुद्ध गमावलेला नाही त्यामुळे हा सामना सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे दबावाखाली भारतीय संघ नेहमी चांगला खेळताना दिसला आहे पाकिस्तान दबाव हाताळू शकत नाही हे स्पष्ट असल्याने या सामन्यात सुद्धा भारताचा विजय होण्याची शक्यता आहे मात्र ज्या दिवशी जो संघ चांगला खेळतो त्याचा विजय होतो तरीही भारत जिंकेल अशी आशा आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच केवळ भारत पाकिस्तान साठी नव्हे तर जगासाठी औत्सुक्याचा असतो त्यामुळे क्रिकेट रसिकांसाठी ही महत्त्वाची पर्वणी असणार आहे त्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असल्याचेही सेहवाग म्हणाले.
हेही वाचा: