मुंबई : आई तुळजाभवानीच्या मंदिरातील भोपे हे पुजारी कुटुंब आहे आणि या कुटुंबातील महिलांनी देखील अनेकदा गाभाऱ्यामध्ये जाऊन आई तुळजाभवानीची दर्शन घेण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केलेली आहे. मात्र, त्यांना त्यामध्ये यश आले नाही. ही महिलांची अनेक दिवसांची मागणी आहे. सामान्य महिलांना तर नाहीच, परंतु मलाही आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात गेल्यावर्षी (27 नोव्हेंबर 2022)रोजी नाकारला प्रवेश नाकारला होता, असा खुलासा महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. दरम्यान, हा दुजाभाव आहे असे म्हणत त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
प्रवेश दिला नसल्याचा अनुभव घ्यावा लागला : पुजाऱ्यांच्या कुटुंबातील महिलेने विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हे सांगितल्यावर दस्तुरखुद्द नीलम ताई गोरे यांना देखील मागच्या वर्षी गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला नसल्याचा अनुभव घ्यावा लागला आणि त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासन यांना ही बाब सांगितले प्रशासन आपापल्या तऱ्हेने कायदा चालवतात हे त्यांच्या लक्षात आल्याचे निदर्शनास त्यांनी आता समोर आणलेले आहे.
कुणालाच गाभाऱ्यात सोडायचं नाही : नीलम ताई गोरे यांनी यासंदर्भात स्पष्टपणे माहिती दिली की, महाराष्ट्राची कुलदैवत असलेली आई तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात काही ठराविक आमदार आणि मंत्र्यांनाच परवानगी आहे मात्र महिला आमदारांना आणि सामान्य महिलांना त्या गाभाऱ्यात प्रवेश नाही. तसेच, मागील वर्षीच्या (दि. २७ नोव्हेंबर २०२२)रोजी मी स्वतः ज्यावेळेला तिथे गेले, त्यावेळेला कुणालाच गाभाऱ्यात सोडायचं नाही ,असा नियम आहे, अशा प्रकारे मला सांगण्यात आलं. तो नियम मी त्यावेळेला पाळला. मात्र त्याच्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी हे (दि. ०२ जानेवारी, २०२३)रोजी सह कुटुंब गाभाऱ्यात गेले.
तुळजाभवानी मंदिरात तीन कायदे : काही ठराविक मंत्र्यांनाही गाभाऱ्यात प्रवेश दिला गेला. मात्र सामान्य महिला, महिला लोकप्रतिनिधी गेल्या किंवा महिलांनी गाभाऱ्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना जाऊ दिल जात नाही, अशी सरळ सरळ दुजा भावाची भूमिका असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले. यात गाभाऱ्यात प्रवेशाबाबत प्रशासनाकडे नियमावली नाही. यासंदर्भात तुळजाभवानी मंदिरात तीन कायदे आहेत प्रशासन हे त्यांना योग्य वाटतो त्याप्रमाणे त्या कायद्याच्या अंमलबजावणी करतात हे अतिशय चुकीचे आहे. विधी व न्याय विभागाने यासंदर्भात उचित निर्णय तात्काळ घेण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा : यंदा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन; धुमधडाक्यात होणार साजरा