ETV Bharat / state

Mumbai News : मुंबईकर सावधान... विना परवानगी कूपनलिका खोदल्यास ,पालिका करणार कठोर कायदेशीर कारवाई

मुंबईत अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुंबईकर नेहमीच सामना करत असतात. त्यामुळे काही वेळा खाजगी कूपनलिका देखील काही जण खोदून घेतात. मात्र, आता जर तुम्ही विनापरवाना खाजगी कूपनलिका खोदली असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका कठोर कारवाई करणार आहे.

Brihanmumbai Municipal Corporation
बृहन्मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jan 21, 2023, 11:52 AM IST

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपासून ते दोन वेळेची जेवणाची भ्रांत असलेले अशा सर्व स्तरातील लोक राहतात. अशा या मुंबईत समस्यांची कमी नाही. यातील प्रमुख समस्या म्हणजे पाणी. अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुंबईकर नेहमीच सामना करत असतात. त्यामुळे काही वेळा खाजगी कूपनलिका देखील काही जण खोदून घेतात. मात्र, आता जर तुम्ही विनापरवाना खाजगी खूप नलिका खोदली असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका कठोर कारवाई करणार आहे.

कुपनलिकांमुळे दुर्घटना : या संदर्भातील माहिती देणारे एक प्रसिद्धीपत्रक बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आले आहे. यात पालिकेने म्हटले की, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील पाणीपुरवठ्यासाठी गुंदवलीपासून भांडुप संकुल जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत तलावातील पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत जल बोगद्याची व्यवस्था केली आहे. तसेच, भांडुप संकुल येथून शहर व उपनगरातील विविध सेवा जलाशयापर्यंत व सेवाजलाशयापासून ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलबोगद्याचे जाळे उभारले आहे. मागील काही वर्षात विंधन विहिरी, कूपनलिका खोदताना भूमिगत जलबोगद्यास हानी पोहचून दुर्घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे पाणीपुरवठा बऱ्याच कालावधीकरीता विस्कळीत होतो व नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागतो.

BMC TMC कडून परवानगी घेणे : अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशी, बांधकाम व्यावसायिक, विकासक, सार्वजनिक संस्था, विंधन विहिरी खणणारे कंत्राटदार, विंधन विहिरी खणण्यासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देणारे कंत्राटदार आणि इतर सर्व नागरिकांनी वैयक्तिक अथवा सार्वजनिक कूपनलिका खोदण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका यांचेकडे असणारी कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच विनापरवानगी कूपनलिका खोदल्याने होणाऱ्या दुर्घटनेसाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे कळविण्यात येत आहे. त्यामुळे आता मुंबईत होणारी पाणी चोरी देखील थांबते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, याच कूपनलिका द्वारे अनेक वेळा मुंबईत पाणी चोरी केली जाते. त्यामुळे आता पालिकेच्या कारवाईच्या भीतीने विनापरवाना कुपनलिका बंद होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : Job In BMC मुंबई महापालिकेत लघुलेखक पदासाठी भरती 27 जागांसाठी होणार भरती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.