ETV Bharat / state

रणधुमाळी विधानसभेची : काय म्हणतोय मुंबईतील सर्वात कमी शिकलेला उमेदवार

राजेंद्र नंदागवळी हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील आहेत. मुंबईतील नाक्यावर ते काम करतात. विलेपार्ले मतदारसंघात काँग्रेस, भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी मुख्य उमेदवारांच्या विरोधात ते मैदानात उतरले आहेत. आपल्या उमेदवारीसंदर्भात बोलताना राजेंद्र म्हणाले, "स्थानिकांना रोजगार मिळावा ही माझी प्रमुख मागणी आहे.

राजेंद्र नंदागवळी
author img

By

Published : Oct 11, 2019, 1:48 PM IST

मुंबई - विले पार्ले हा मुंबईतील सर्वात उच्चशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. परंतु याच मतदारसंघात मुंबईतील सर्वात कमी शिकलेला उमेदवार उभा आहे. राजेंद्र नंदागवळी असे या उमेदवाराचे नाव आहे. राजेंद्र रिक्षा या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. पहिली पर्यंतचेही शिक्षण झालेले नसताना केवळ कामगारांच्या प्रश्नांना न्याय आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते उच्चशिक्षित उमेदवारांच्या विरोधात उभे असल्याचे ते सांगतात.

पहा मुंबईतील सर्वात कमी शिकलेला उमेदवार काय म्हणतो

राजेंद्र नंदागवळी हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील आहेत. मुंबईतील नाक्यावर ते काम करतात. विलेपार्ले मतदारसंघात काँग्रेस, भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी मुख्य उमेदवारांच्या विरोधात ते मैदानात उतरले आहेत. आपल्या उमेदवारीसंदर्भात बोलताना राजेंद्र म्हणाले, "स्थानिकांना रोजगार मिळावा ही माझी प्रमुख मागणी आहे. कार्गो आदी ठिकाणी स्थानिकांना पळवून लावून इतर राज्यातील लोकांना रोजगार दिला जातो. याविरोधात मी उभा राहिलो आहे. ज्या कंपन्यांमध्ये स्थानिकांची संख्या जास्त होती अशा कंपन्या अनेक बंद करून त्या दुसऱ्या नावाने सुरू करण्यात आल्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा आणि कामगारांचे थकलेले पगार मिळावेत, ही भूमिका घेऊन मी मतदारसंघात फिरणार आहे"

हेही वाचा - ईव्हीएमवर ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवा - आंदोलकांची मागणी

या सरकारने नोकरीची अनेक आश्वासने दिली. परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरेपही त्यांनी केला आहे. लोक त्यांना स्वत:हून साथ देत आहेत. रोजगार, रोटी, कपडा आणि घर हे सर्व कामगार आणि गोरगरिबांना मिळाले पाहिजे, प्रमुख अजेंडा असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक चिन्ह रिक्षा आणि रिक्षा चालकांविषयीही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, रिक्षा चालकांचे प्रश्न आणि त्यांचे दुःख मला चांगले माहित आहे. जोपर्यंत रिक्षा चालवतात तोपर्यंत त्यांच्या हातात पैसा येतो. पण, त्यानंतर त्यांना काहीच मिळत नाही, म्हणून त्यांना निवृत्ती वेतन आणि इतर फायदे मिळावेत अशी माझी मागणी आहे. नाका कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही" आपल्याला एक कामगार म्हणून कामगारांसाठी आवाज उठवायचा आहे, असे राजेंद्र यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:सर्वात कमी शिकलेला उमेदवार काय म्हणतो......

यासाठी व्हिज byte हे जोडत आहे, चांगले pkg करता येईल..

स्क्रिप्ट मोजोवर पाठवली आहे...

Body:सर्वात कमी शिकलेला उमेदवार काय म्हणतो......

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.