ETV Bharat / state

पावसाचा कहर: राज्यभरात गेल्या 48 तासात 50 बळी

गेल्या 2 दिवसात राज्यभरामध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश घटना या मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि नाशिकमध्ये घडल्या आहेत.

author img

By

Published : Jul 3, 2019, 11:37 AM IST

Updated : Jul 3, 2019, 12:51 PM IST

गेल्या 48 तासात 48 बळी

मुंबई - गेल्या 2 दिवसात राज्यभरामध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश घटना या मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि नाशिकमध्ये घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळल्याने घरांचेही नुकसान झाले आहेत. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मालाड भिंत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू

सोमवारी मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे तर तर 75 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पालिकेच्या ट्रॉमा केअर, कूपर, शताब्दी, एमव्ही देसाई तसेच केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रत्नागिरीतील तिवरे धरण फुटले 23 जण गेले वाहून, 8 मृतदेह हाती

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास 23 जण वाहून गेले होते. त्यापैकी 8 मृतदेह हाती लागले आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. गुरं ढोर पाण्यात वाहून गेली आहेत. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाण्यात कार अडकल्याने गुदमरुन दोघांचा मृत्यू

मुंबईतील मालाड सबवेमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये एक कार अडकून 2 मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री तीनच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडी पाण्यामध्ये अडकली होती. यामधील दोघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. इरफान खान (वय 37), गुलशद शेख (वय 38) अशी मृतांची नावे आहेत.

सुरक्षा भिंत कोसळून एकाचा तर शॉक लागून दोघांचा मृत्यू

मुलुंड येथे सुरक्षा भिंत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे तर विलेपार्ले येथे शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

नॅशनल उर्दू हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू

कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ल्यासमोर असलेल्या नॅशनल उर्दू हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळून लगतच्या झोपड्यांवर पडल्‍याची घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये मध्ये २ महिला आणि एक ३ वर्षीय मुलाचा समावेश आहे. शोभा कांबळे (वय ६०), करीना मोहम्मद चंद (वय २५) आणि हुसेन मोहम्मद चंद (वय ३), असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पाण्याची टाकी कोसळून 4 मजुरांचा मृत्यू

नाशिकमधल्या गंगापूर रोड येथील धृवनगर परिसरात आपना घर या बांधकाम प्रकल्पात १५ हजार लिटर क्षमतेची वीस फूट उंचीची पाण्याची टाकी अचानकपणे कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 4 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहे. चौकशी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

पुण्यातील सिंहगड परिसरात भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू

कोंढव्यातील 15 जणांचा बळी घेणारी दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती झाल्याची आणखी एक घटना घडली. मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमधील 4 जण मुळचे छत्तीसगड तर, 2 हे मध्य प्रदेश राज्याचे रहिवाशी आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 3, 2019, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.