मुंबई- अंधेरी न्यायालयानं ड्रग्ज माफिया ललित पाटीलला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आलं. त्यामध्ये ललित पाटील हा १५ वा आरोपी आहे. आजपर्यंत ३०० कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. आरोपी ललितला बंगळुरूमधून अटक करण्यात आल्याचं मुंबई पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी ( कायदा व सुव्यवस्था) सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाशिकमधील छाप्यानंतर पोलीस ललितच्या मागावर होते. ड्रग्ज मोठ रॅकेट उद्धवस्त केले होतं. त्याला चेन्नई आणि बंगळुरूच्या दरम्यान अटक केली. ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आजपर्यंत १५ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये ललित पाटील हा १५ वा आरोपी असल्याची माहिती मुंबई पोलीस सहआयुक्तांनी दिली.
दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांच्या पथकाने बंगळुरू येथून अटक केली आहे. त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील याला आज पहाटे मुंबईत आणण्यात आलं. त्याला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं असून कोठडी सुनावल्याचं एका वकिलाने सांगितलं.
पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा- मुंबई पोलिसांच्या वकिलाने सांगितलं की, पाटील हा नाशिक ड्रग्ज रॅकेटमधील आरोपी आहे. तो मुंबईस्थित पुरवठादाराकडून कच्चा माल मिळवत होता. त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. रिमांडच्या सुनावणीदरम्यान, आपण पळालो नव्हतो, तर आपलं अपहरण करण्यात आलं होतं, अस दावा त्याने केला. तसेच पुणे पोलिसांकडून जीवाला धोका असल्याचही त्यानं सांगितलं, अशी माहिती वकिलाने माध्यमांना दिली.
विरोधकांचा सरकारवर निशाणा- मुंबई पोलिसांनी यापूर्वी नाशिकमधील अंमली पदार्थ उत्पादनाचं रॅकेट उद्ध्वस्त केले होते. त्यावेळी पाटीलला अटक झाली होती. मात्र जूनमध्ये टीबी आणि हर्नियाच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2 ऑक्टोबर रोजी एक्स रे काढण्यासाठी जाताना ललित पाटीलनं पलायन गेल्यानंतर मोठी खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेता बाळासाहेब थोरात, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धनगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि आमदार रोहित पवार यांनी ललित पाटीलच्या पलायनावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. ललित पाटीलची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली.
बंगळुरूमधून अटक- पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा साथीदार सुभाष मोंडल याला ससून हॉस्पिटलच्या बाहेरून 2 कोटी रुपयांच्या 1.70 किलो एमडीच्या पाकिटासह पकडले होते. ससूनमधील पळून गेल्यानंतर ड्रग्ज माफिया पाटील बहुतेकवेळा रस्त्यानं प्रवास करत होता. धुळे, औरंगाबाद, गुजरात, तामिळनाडूमार्गे कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांनी टेक-इंटेलचा वापरून त्याचा माग काढत अटक केली.
हेही वाचा-
- Sanjay Raut On Dada Bhuse :...म्हणून मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घ्यावा; संजय राऊतांची मागणी
- Lalit Patil Case: ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे 5 दिवसांची पोलीस कोठडी
- Sassoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईमधून अटक, ससून रुग्णालयातून झाला होता पसार