मुंबई - मानाचा गणपती समजला जाणाऱ्या लालबागच्या राजाला गणेशोत्सवादरम्यान भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा सोमवारी लिलाव करण्यात आला. यावेळी बाप्पाच्या अंगावर चढवण्यात आलेल्या दागिन्यांच्या लिलावसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पण, दरवर्षीपेक्षा यावर्षी बाप्पाला अर्पण करण्यात येणाऱ्या सोन्याचा ओघ कमी झाला असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार
बाप्पाला अर्पण केलेल्या दागिन्यांच्या लिलावादरम्यान चढ्या किमतीत खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली आहे. लाखो रुपये किमतीच्या बोली बाप्पाच्या वस्तूंवर लागत आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सोवाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी मदतपेटीत पैशाच्या रुपात यावर्षी अधिक मदत आली असल्याचे सांगितले.