ETV Bharat / state

मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, तलावांमध्ये ७१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या २ लाख ६६ हजार ८४८ दशलक्ष लिटर इतका पाणी साठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मुंबईला ७१ दिवस म्हणजेच २ महिने १० दिवस पुरेल इतका आहे. मुंबईच्या तलावात सुमारे १८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असणार आहे.

lakes that supply water to Mumbai have enough water for 71 days
मुंबईला ७१ दिवस पुरेल इतकाच तलावांमध्ये पाणीसाठा
author img

By

Published : Jul 8, 2021, 11:26 AM IST

मुंबई - मुंबईमध्ये सुमारे दीड कोटी नागरिक राहत असून त्यांना दिवसाला ३७५० दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या २ लाख ६६ हजार ८४८ दशलक्ष लिटर इतका पाणी साठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मुंबईला ७१ दिवस म्हणजेच २ महिने १० दिवस पुरेल इतका आहे. वर्षाला लागणाऱ्या पाणीसाठ्यापेक्षा सध्या मुंबईच्या तलावात सुमारे १८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असणार आहे.

२ महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक -

मुंबईला सात धरण आणि तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईमध्ये रोज ३७५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. वर्षभरात मुंबईकरांना १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. मुंबईमध्ये जूनच्या सुरुवातीला दहा दिवस पाऊस पडला होता. त्यानंतर २० दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारली आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, भातसा व मध्य वैतरणा या सर्वाधिक पाणी साठवणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची मोठी वाढ झालेली नाही. तलावांमध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ६६ हजार ८४८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मुंबईला ७१ दिवस म्हणजेच दोन महिने १० दिवस पुरेल इतकाच आहे.

मागील वर्षापेक्षा पाणीसाठा अधिक -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ६६ हजार ८४८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये आजच्या दिवशी २ लाख ४ हजार ५२० दशलक्ष लिटर तर २०१९ मध्ये ३ लाख ३ हजार २८९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता.

तर पाणी कपातीचा निर्णय -

येत्या काही दिवसांत दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईत पिण्याच्या पाण्याची समस्या कठीण होऊ शकते. पालिका दरवर्षी ३० जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा आणि येत्या काळातील पावसाचा अंदाज घेऊन कपातीचा निर्णय घेते. सध्या असलेल्या साठ्याच्या तुलनेत पाणीकपातीची शक्यता नाही. तरीही खबरदारी म्हणून पालिका लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या आठवडा अखेरीस पुन्हा दमदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची वाट पाहू, तसेच पुढील आठवड्यातही पाऊस न आल्यास कपातीचा निर्णय घ्यायचा की आणखी काही दिवस वाट पाहायची याबाबत बैठक घेतली जाणार आहे. अशी माहिती पालिकेचे प्रमुख जल अभियंता अजय राठोड यांनी दिली.

धरण, तलावांमधील पाण्याची स्थिती -

  • मोडक सागर - ४२,४७७ दशलक्ष लिटर
  • तानसा - ४४,८७२ दशलक्ष लिटर
  • मध्य वैतरणा - २२,५८२ दशलक्ष लिटर
  • भातसा - १,३४,१५० दशलक्ष लिटर
  • विहार - १६,८४६ दशलक्ष लिटर
  • तुळशी - ५,९२३ दशलक्ष लिटर
  • एकूण - २,६६,८४८ दशलक्ष लिटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.