ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे मजुरांनी धरला घरचा रस्ता; मुंबईतील रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी - Labor crowd Shivaji Terminus

गेल्या काही दिवसांपासून मुंबई साेडण्यासाठी मजूर प्रवाशांनी रेल्वे स्थानकात ताेबा गर्दी केली आहे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असली, तरी स्थानकात येणारे लाेंढे वाढतच आहेत. आरक्षित तिकिटांशिवाय प्रवास करता येणार नसला, तरी विशेष गाडीत आपल्याला सीट मिळेल या आशेवर हजाराे प्रवासी मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर उभे आहेत. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात श्रमिक मजुरांची गैरसोय सुद्धा होत आहे.

Labor Migration Lockdown Mumbai
मजूर स्थलांतरण लॉकडाऊन मुंबई
author img

By

Published : Apr 20, 2021, 5:12 PM IST

Updated : Apr 20, 2021, 5:37 PM IST

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून मुंबई साेडण्यासाठी मजूर प्रवाशांनी रेल्वे स्थानकात ताेबा गर्दी केली आहे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असली, तरी स्थानकात येणारे लाेंढे वाढतच आहेत. आरक्षित तिकिटांशिवाय प्रवास करता येणार नसला, तरी विशेष गाडीत आपल्याला सीट मिळेल या आशेवर हजाराे प्रवासी लाेकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर टर्मिनसच्या बाहेर उभे आहे. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात श्रमिक मजुरांची गैरसोय सुद्धा होत आहे.

माहिती देताना श्रमिक

श्रमिकांची अशी आहे आकडेवारी

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन लावला होता. परिणामी, संपूर्ण देशाची रेल्वे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प करण्यात आली हाती. यामुळे लाखाे स्थलांतरित मजुरांचे अतोनात हाल झाले. अनंत यातना झेलत घरी पोहचलेले मजूर पुन्हा पोटासाठी शहरात आले. गेल्या वर्षी लॉकडाऊनची घाेषणा हाेताच संपूर्ण राज्यातून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८४४ ट्रेनमधून १८ लाख श्रमिकांनी आपले गाव गाठले हाेते. यापैकी १० लाख मजुरांनी मुंबई साेडली हाेती. जुलै महिन्यापर्यंत मुंबईत ५ लाख नागरिक परत आले हाेते. यातील ४ लाख मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून आले होते. आता पुन्हा कोरोना पाठोपाठ लॉकडाऊनही आला. पण, आता तसे हाल नको म्हणून मजुरांनी घरचा रस्ता धरला आहे.

हेही वाचा - मुंबईत दोन महिन्यात 147 डॉक्टरांना कोरोनाची लागण

राज्यात १ एप्रिल पासून निर्बंध लागू केलेत. पश्चिम रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार १ ते १२ एप्रिल दरम्यान १९६ ट्रेनमधून ४ लाख ३२ हजार ९६३ प्रवासी आसाम, युपी, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालला रवाना झाले. यापैकी १५० ट्रेनमधून ३ लाख २२ हजार ९४४ प्रवाशांनी उत्तर प्रदेश आणि बिहार गाठले आहे. उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एका ट्रेनमधून २ हजार १५२ प्रवाशांनी प्रवास केला. मध्य रेल्वेवर दरराेज उत्तर आणि पूर्व भारताकरिता २८ ट्रेन चालविण्यात येत आहेत. यामध्ये १८ ट्रेन नियमित, तर १० गाड्या स्पेशल आहेत. एका ट्रेनमधून सरासरी १ हजार ४०० प्रवासी जात आहेत. गेल्या १५ दिवसांत मध्य रेल्वेवरून ३ लाख ५० हजार प्रवाशांनी मुंबई साेडली.

श्रमिक ट्रेनची मागणी

मध्य रेल्वेने गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान २७ मे राेजी एका दिवसात ८० श्रमिक ट्रेन चालविल्या हाेत्या. याकरिता राज्य सरकारने प्रवाशांना रेल्वे स्थानकात आणले हाेते. मध्य रेल्वेने त्या काळात २० राज्यांसाठी एकूण ४०३ श्रमिक ट्रेनद्वारे सुमारे ६ लाख मजुरांची वाहतूक केली. आता राज्यातून पलायन हाेण्याची तिच स्थिती आहे. परंतु, व्यवस्था मात्र वेगळी आहे. रेल्वे प्रशासन वेटिंग लिस्टनुसार स्पेशल ट्रेनची साेय करीत आहे. तसेच, रेल्वेकडून आवाहन करण्यात येत आहे की, प्रवाशांना स्थानकांवर गर्दी करू नये. ट्रेन सुटण्याच्या ९० मिनिटे आधी रेल्वे स्थानकांवर यावे. रेल्वे प्रशासन वेटिंग लिस्टवर लक्ष ठेवून आहे. आवश्यकता असल्यास अतिरिक्त स्पेशल ट्रेन सोडण्यात येतील. ३० जून पर्यत १५६ स्पेशल ट्रेन चालविणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

आम्हाला गावी जायचे आहे

ईटीव्ही भारतला रेहमान यांनी सांगितले की, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, शासनाने निर्बंध घातले असून आमचा व्यवसाय ठप्प आहे. मागील दहा दिवसांपासून रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्याने आरक्षित तिकीट मिळालेली नाही. आज झारखंड जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढली आहे, मात्र ती सुद्धा प्रतिक्षा यादीत आहे. मुंबईत आमचे अतोनात हाल होत असून कोणत्याही परिस्थितीत गावाकडे जायचे आहे. राज्य शासनाने गेल्या वर्षी प्रमाणे आताही श्रमिक ट्रेन चालवावीत.

आमच्या जेवणाचे हाल

गिरीराज कुमार यांनी सांगितले की, मी गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो आहे. मात्र, हॉटेलमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, हॉटेल बंद करून आम्हाला गावाकडे जाण्याचा सल्ला हॉटेल मालकांनी दिला. कोरोनाची गंभीरता लक्षात घेता आम्ही कामगार गावाकडे निघालो आहोत. सध्या राज्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे आमची रोजी रोटी गेली आहे. तसेच, मुंबईत आता पोट भरण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. गावाकडे सुद्धा कुटुंबीयांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे, आता मी गावाकडे जात आहे.

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-

'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा

अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव

साताऱ्यातील यवतेश्वर घाटात उडी घेऊन १६ वर्षीय युवतीची आत्महत्या, आधारकार्डवरुन पटली ओळख

लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक

नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला

हेही वाचा - तन्मय माझा लांबचा नातेवाईक; पुतण्याच्या लसीकरणाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

Last Updated : Apr 20, 2021, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.