ETV Bharat / state

गणेशोत्सवात आमका गावी येऊचा हा महाराजा, चाकरमान्यांची गणरायाला साद - कोकणातील बातम्या

मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरे, ठाणे, दिवा, बदलापूरपर्यंत लाखो कोकणवासीय राहतात. दरवर्षी गणेशोत्सवात हा चाकरमानी मुलां-बाळांसोबत गावी जातो. मात्र यावेळी कोकणातील मूळ गावी जायला मिळणार का? असा प्रश्न भेडसावत आहे. या मुद्द्यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. यंदा कोरोनाचे संकट असले तरी गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी नियमावली निश्चित करावी, जेणेकरून आम्हाला जास्त त्रास होणार, असे चाकरमान्यांचे म्हणणे आहे.

कोकण गणेशोत्सव
गणेशोत्सवात आमका गावी येऊचा हा महाराजा, चाकरमान्यांची साद
author img

By

Published : Jul 14, 2020, 1:06 PM IST

मुंबई - हे देवा महाराजा... येत्या गणेशोत्सवात आमका गावी येऊचा हा... तुझ्या कृपेने सर्वाना सुखरूप पाहायचे आहे... मानव जात कोरोना मुक्त होऊ दे... असे गाऱ्हाणे चाकरमान्यांनी गणेश देवताकडे घालायला सुरूवात केली आहे. याला कारण ही तसेच आहे. गणेशोत्सव जवळ आला की, कोकणातील पण मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागतात. परंतु, यंदाच्या वर्षी कोरोनाचे महाकाय संकट आ असून उभे आहे. एरवी कोणतेही संकट असले तरी गणेशोत्सवासाठी गावी जातो तोच खरा कोकणी माणूस. यंदा कोरोना संकट असूनही गावी जाण्याचे निर्धार चाकरमान्यांनी केला आहे. याबाबत 'ईटिव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट...

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक सण, उत्सव घरच्या घरी साजरे करण्यात आले आहेत. कोकणात गणेशोत्सव सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना होते. परंतु, चाकरमानी मुंबईत आणि घर गावी अशी स्थिती असते. यावेळी लॉकडाऊन, कोरोना असला तरी गणेशोत्सवासाठी आता आम्हाला आमच्या कोकणातील गावात सुखरूप जाऊ द्या, आडकाठी करू नका, अशी मागणी आता मुंबईतील चाकरमान्यांकडून केली जात आहे.

चाकरमानी आपल्या भावना व्यक्त करताना...

मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरे, ठाणे, दिवा, बदलापूरपर्यंत लाखो कोकणवासीय राहतात. दरवर्षी गणेशोत्सवात हा चाकरमानी मुलां-बाळांसोबत गावी जातो. मात्र यावेळी कोकणातील मूळ गावी जायला मिळणार का? असा प्रश्न भेडसावत आहे. या मुद्द्यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. यंदा कोरोनाचे संकट असले तरी गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी नियमावली निश्चित करावी, जेणेकरून आम्हाला जास्त त्रास होणार, असे चाकरमान्यांचे म्हणणे आहे.

सिंधुदुर्ग प्रशासनाने आपल्या नियमावलीत असे नमूद केले आहे की, जर चाकरमानी ई-पास घेऊन आले तरच त्यांना प्रवेश मिळणार. म्हणजे आपल्याच मूळगावी प्रवेश मिळण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्हा या ठिकाणाहून गणपती उत्सवासाठी चाकरमानी अर्ज करतील. सदर अर्ज शासन किती दिवसात मंजूर (approve) करणार हे जाहीर करावे. परजिल्ह्यातून गेल्यानंतर १४ दिवस विलगीकरणात असताना, गणेशभक्तांची तब्बेत खालावली तर त्यावर शासनाने केलेली उपाययोजना जाहीर करावी, असे काही प्रश्न सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र झोरे यांनी सरकार समोर उपस्थित केले आहेत.

कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव खूप महत्त्वाचा सण आहे. शासनाने आम्हाला सोयीस्करपणे कोकणात जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आम्ही हे सांगू इच्छितो की, आमच्यामुळे कोणालाही ही त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. जसे आलो तसे परत जाऊ, असे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'लॉकडाऊन'मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या; जाणून घ्या आकडेवारी

हेही वाचा - 'श्रीमंत आणि गरीब भेदभाव नको; अमिताभ प्रमाणे गरिबांवरही खासगी रुग्णालयात उपचार करा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.