ETV Bharat / state

कोणत्याही समितीमार्फत चौकशी करा; माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

Kishori Pednekar On BMC : मंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही समिती मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणत्याही समितीमार्फत चौकशी करा असं आव्हान दिलं आहे.

Kishori Pednekar On BMC
माजी महापौर किशोरी पेडणेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 3:20 PM IST

मुंबई Kishori Pednekar On BMC : महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी सत्ताधारी सरसावले आहेत. मात्र मुंबई महापालिकेची कुठल्याही समितीनं चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत. कालपर्यंत तुम्ही सोबत होतात, तेव्हा तुम्हाला घोटाळे दिसले नाहीत का, असा सवाल माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. कसलीही चौकशी करा, आम्ही तयार आहोत, असं प्रति आव्हान मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी : नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना अनेक सदस्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर कॅगनं ठपका ठेवला आहे. त्यामुळं आता चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर नगर विकास विभागाचा प्रभार असलेल्या मंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असून गेल्या 25 वर्षातील कारभाराची चौकशी होईल, अशी ग्वाही दिली.

कशी असेल चौकशी समिती : मुंबई महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षातील कारभाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नगर विकास विभाग आणि वित्त विभागाचे संचालक या तीन सदस्यांच्या नियंत्रणाखाली ही समिती काम करणार असून ही समिती पुढील अधिवेशनापूर्वी आपला अहवाल सादर करणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. "यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या कारभारातील दोष आणि उणिवा समोर येतील. मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्यात येईल. श्वेत पत्रिकाही लवकर काढण्यात येईल", असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेची चौकशी का झोंबते : विरोधी पक्षांकडून सातत्यानं अन्य महानगरपालिकांच्या चौकशी बाबतीत समिती नेमण्यात यावी, अशी मागणी होत आहे, असं उदय सामंत यांना विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी "मुंबई महानगरपालिकेच्या चौकशीचा विषय निघाल्यानंतर अन्य महानगरपालिकांच्या चौकशीची का मागणी केली जाते, मुंबई महानगरपालिकेची चौकशी का एव्हढी झोंबते? या संदर्भात यथावकाश निर्णय घेतला जाईल", असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महापालिकेवर कॅगचा ठपका : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई महापालिकेवर ठपका ठेवल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मुंबई महानगरपालिकेत कोरोना कालावधीतील बारा हजार कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला होता. मुंबई महापालिकेचा कारभार हा भ्रष्ट होता, 64 कंत्राटदार आणि बीएमसीत करार नसताना देखील कामं आणि बिलं दिली गेली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कामाचं बजेट वाढवलं. रस्ते आणि वाहतुकीत 51 कामं ही सर्वेक्षणाशिवाय केली. माहिती तंत्रज्ञान विभागात निविदा न मागवताच टेंडर दिलं, असा आरोप करण्यात आला होता.

कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "पंचवीस वर्षातील कामांची काय करायची ती चौकशी करा. कोणत्याही समितीच्या चौकशीला आम्ही घाबरत नाही. मुळात जे लोक कालपर्यंत आमच्या सोबत होते ते आज पलीकडं गेल्याबरोबर चौकशी घोषित करतात. सोबत असताना त्यांना घोटाळे दिसले नव्हते," का असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं कोणतीही आणि कसलीही चौकशी करा, असं किशोरी पेडणेकर यांनी प्रति आव्हान दिलं आहे.

25 काय 50 वर्षाची चौकशी करा : "मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत सर्व काही उघड आहे. यापूर्वीही महापालिकेची ऑडिट झालेली आहेत. कॅगनं यापूर्वीही ठपका ठेवला आहे. गेली 25 वर्षे काँग्रेस भाजपाच सत्तेत होती. त्यामुळं पंचवीसच काय पन्नास वर्षाची चौकशी करायलाही हरकत नाही" अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

  1. बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची ईडीनं केली ६ तास चौकशी
  2. Kishori Pednekar SRA Scam : मुंबईच्या माजी महापौर पेडणेकरांचा एसआरए घोटाळा; पालिकेने केले घर सील?
  3. Kishori Pednekar News : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन तास चौकशी, नेमक प्रकरण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.