मुंबई - भाजप-शिवसेनेच्या विजयी संकल्प मेळाव्यास माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंचावर येण्यास नकार दिला. त्यामुळे अद्यापही सोमय्या शिवसेनेवर नाराज असल्याचे दिसून आले. ईशान्य मुंबईमधून सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेने विरोध केला होता.
ईशान्य मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांच्या विजय संकल्प मेळावा घाटकोपरच्या सोमय्या मैदानात आयोजित केला होता. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
ईशान्य मुंबई मधून सोमैय्या यांना उमेदवारी देण्याला शिवसेनेने विरोध केला होता .ईशान्य मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांच्या विजय संकल्प मेळावा आज घाटकोपरच्या सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आला होता.यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईत किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून तीव्र विरोध झाला होता. किरीट सोमय्यांची उमेदवारी जवज-जवळ निश्चित झाली होती. सोमय्या यांनी काही महिने ईशान्य मुंबईत मतदारसंघात फिरून प्रचारही केला होता. पण सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर महानगरपालिका निवडणुकीत जोरदार टीका केले होती. त्यामुळे ईशान्य मुंबईत सोमय्यांना शिवसेनेने विरोध केला होता. शेवटी भाजपने सोमय्यांना उमेदवारी दिली तर विक्रोळीचे शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेचा विरोध कायम असल्याने नगरसेवक मनोज कोटक यांना खासदरकीची लॉटरी लागली.
आजच्या विजय संकल्प मेळाव्यात माजी खासदार किरीट सोमय्यांना मंचावर बोलावण्यात आले. तरी ते मंचावर गेले नाहीत. यातून त्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले.