मुंबई Kirit Somaiya On Oxygen Scam : याप्रसंगी बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, आज सकाळी लालबागच्या राजाच्या गणपतीचं दर्शन घेतलं. याप्रसंगी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की, (Uddhav Thackeray Party) उद्धव ठाकरे सेनेच्या राक्षसी प्रवृत्तीमुळे मुंबईच्या हजारो कोविड रुग्णांना त्रास सहन करावा लागला. काहींना (Kirit Somaiya) आपला जीव गमवावा लागला. (Oxygen Scam) काहींच्या आयुष्याचं कायमस्वरूपी नुकसान झालं. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे सेनेचे जवळजवळ दोन डझन नेते हे कोविड काळात फक्त कोविडची कमाई खाण्यामध्ये व्यग्र होते, असा आरोपही सोमैया यांनी केला आहे.
बेनामी कंपन्यांच्या नावाने ऑक्सिजन घोटाळा : किरीट सोमैया पुढे म्हणाले की, आता एक नवीन घोटाळा समोर आला आहे. उद्धव ठाकरे सेनेचे व मातोश्रीवर ज्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनी कोविड रुग्णांचा श्वाससुद्धा चोरला आहे. श्वास चोरण्याचे पाप उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केले आहे. कोविड काळात ऑक्सिजनसाठी १४० कोटी रुपये पेमेंट केले गेले; पण फक्त ३८ कोटी रुपये ऑक्सिजनसाठी खर्च केले. म्हणजे १०० कोटीचं ऑक्सिजन चोरण्याचं पाप उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केलं आहे. यासाठी विविध बेनामी कंपन्यांच्या नावाने हा घोटाळा झाला आहे. विविध एजन्सी या संदर्भात चौकशी करत आहेत. त्यामुळे हा भ्रष्टाचार लवकरच उजेडात येईल असेही सोमैया म्हणाले.
७३ कोटी रुपये गेले कुठे : सोमैया पुढे म्हणाले आहेत की, यात आणखी एक गोष्ट बाहेर आली आहे. आदित्य ठाकरेंचे मित्र राहुल गोम्स यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला दहिसरचे दोन व मुलुंडचे एक कोविड सेंटर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यात भाडेपट्टीच्या नावाने १६५ कोटी रुपयांचे पेमेंट केले गेले आहे; परंतु खर्च फक्त २५ कोटी रुपये झाला आहे. या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये २२ कोटीचा नफा दाखवला आहे व ७३ कोटी रुपये गोम्स मॅनेजमेंट कन्सल्टी मधून बोगस कंपन्यांकडे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. जे संजय राऊत, सुजित पाटकर यांनी केलं तेच आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल गोम्स यांनी केलं आहे, असा आरोप करत ७३ कोटी रुपये गेले कुठे? याची चौकशी आता सुरू आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे सेनेच्या एक डझन नेत्यांची चौकशी सुरू आहे. पुढच्या काही दिवसात अजून अनेक जणांची नावे जनतेपुढे मी ठेवणार आहे, असेही सोमैया म्हणाले आहेत.
हेही वाचा: