ETV Bharat / state

किंग्स सर्कल रेल्वे स्थानक बनले हरित रेल्वे स्थानक

अस्वच्छ किंग्स सर्कल रेल्वे स्थानक आज हरित स्थानक बनले आहे. यासाठी स्टेशन मास्टर, लायन्स क्लब आणि एमएमपी शहा महिला कॉलेजच्या विद्यार्थीनींनी मेहनत घेतली.

किंग्ड सर्कल रेल्वे स्थानकाच्या रंगवलेल्या भिंती
author img

By

Published : May 16, 2019, 9:27 AM IST

मुंबई - भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. यात मुंबईतील रेल्वे स्थानके आणि हार्बर मार्गावरील स्थानक अस्वच्छ दिसले की, प्रवासी नाक मुरडत होते. मात्र, आता हार्बर मार्गावरील किंग्स सर्कल रेल्वे स्थानक स्वच्छ व हरित पाहायला मिळत आहे. येथे स्थानिक नागरिक रोज सकाळी फिरायला येतात. स्थानकाला स्वच्छ आणि हरीत करण्यासाठी स्टेशन मास्टर एन. के. सिन्हा यांनी मेहनत घेतली.

किंग्ड सर्कल रेल्वे स्थानक

किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाच्या बाजूला झोपडपट्टी असल्याने स्थानक कायम अस्वच्छ असायचे. त्यामुळे स्थानक स्वछ ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासाने कितीही प्रयत्न केले, तरी ते निष्फळ ठरायचे. बाजूची झोपडपट्टी उठवल्यानंतर जागा अस्वच्छ व घाण होती. यामुळे स्टेशन मास्टर सिन्हा यांनी ते ठिकाण स्वच्छ कराण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना लायन्स क्लब सायनचे माजी अध्यक्ष ए. आर. संघवी यांनी मदत केली. त्यांनी स्थानिकांच्या मोकळ्या जागेत बगीचा बनविण्याचे ठरवले. त्यासाठी लायन्स क्लब सायनतर्फे मोठ्या प्रमाणावर कचरा व घाण उचलण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळाले हा कचरा उचलल्यामुळे हे कार्य सोपे होत गेले.

स्थानकातील बाग पाहण्यासाठी नागरिक येतील

स्टेशन स्वच्छ रहावे, असे मला वाटत होते. मला वाटते प्रत्येकाने स्वच्छतेसाठी सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक प्रवाशाला असे वाटले पाहिजे की आपण किंग्स रेल्वे स्थानक म्हणजे चांगल्या रेल्वे स्थानक स्वच्छ व सुंदर बाग असलेल्या स्थानकावर आहोत. येत्या काळात किंग्स रेल्वेस्थानकावर एक सुंदर बाग पाहण्यासाठी नागरिक येतील, अशी आशा आहे. त्यामुळे मला समाधान वाटत आहे.

एन. के. सिन्हा, स्टेशन मास्टर, किंग्स सर्कल रेल्वे स्थानक

विद्यार्थिनींच्या श्रमदानामुळे हे शक्य

एमएमपी शहा महिला कॉलेज माटुंगा यांनी महाविद्यालयातील एनएसएस युनिटला सोबत घेऊन हे काम पुढे चालू ठेवले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थीनी रेल्वे स्थानकावर सतत वेळेनुसार श्रमदान करत भिंतीला रंगरंगोटी करतात. त्यांच्या श्रमदानातून तयार झालेल्या या बागेत स्थानिक रहिवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक सायंकाळी फिरायला येतात, त्यांना येथे स्वच्छ व सुंदर, असे वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे अस्वच्छ असलेले हार्बर मार्गावरील किंग्स सर्कल रेल्वे स्थानक भविष्यात खरच किंग सारखे दिसणार आहे.

प्रा. राकेश सिंग, अध्यक्ष, लायन्स क्लब, सायन.

Intro:किंग्स सर्कल रेल्वे स्थानक बनले हरित रेल्वे स्थानक

भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशांमध्ये स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात देशभर राबवली जात आहे .यात मुंबईतील रेल्वे स्थानके आणि त्यातच हार्बर मार्गावरील स्थानक अस्वच्छ दिसले की, प्रवाशी नाक मुरडतात पण आता हार्बर मार्गावरील किंग्स रेल्वे स्थानक स्वच्छ व हरित पाहायला मिळत आहे.येथे स्थानिक रोज फिरायला येतात ती किमया केली आहे स्टेशन मास्टर एन. के .सिन्हा यांच्या मेहनतीनेBody:किंग्स सर्कल रेल्वे स्थानक बनले हरित रेल्वे स्थानक

भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशांमध्ये स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात देशभर राबवली जात आहे .यात मुंबईतील रेल्वे स्थानके आणि त्यातच हार्बर मार्गावरील स्थानक अस्वच्छ दिसले की, प्रवाशी नाक मुरडतात पण आता हार्बर मार्गावरील किंग्स रेल्वे स्थानक स्वच्छ व हरित पाहायला मिळत आहे.येथे स्थानिक रोज फिरायला येतात ती किमया केली आहे स्टेशन मास्टर एन. के .सिन्हा यांच्या मेहनतीने.

किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाच्या बाजूला झोपडपट्टी असल्याने स्थानक कायम अस्वच्छ असायचे त्यामुळे स्वछता ठेवण्यासाठी किती ही रेल्वे प्रशासन प्रयत्न केले तरी निष्फळ ठरायचे.बाजूची झोपडपट्टी उठवल्या नंतर जागा अस्वच्छ व घाण होती त्यामुळे जागा तर मोकळी आहे.पण अस्वच्छ त्यामुळे स्टेशन मास्टर सिन्हा यांनी येथे काही तरी नवीन करायचा प्रयत्न केला व त्याना लायन्स क्लब सायनचे माजी अध्यक्ष ए. आर. संघवी भेटले
त्यांनी स्टेशनचा मोकळ्या जागेचा बगीचा बनवण्याचे ठरवले त्यासाठी लायन्स क्लब सायन तर्फे मोठ्या प्रमाणात कचरा व घाण उचलण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळाले हा कचरा उचलला त्यामुळे हे कार्य सोपे होत गेले.

एन के सिन्हा स्टेशन मास्टर किंग्स सर्कल रेल्वे स्थानक

स्टेशन स्वच्छता ठेवणे हे मला आतून आवाज मिळाला मला वाटते प्रत्येकाने स्वच्छता ठेवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे प्रत्येक प्रवाशाला असे वाटले पाहिजे की आपण किंग्स रेल्वे स्थानक म्हणजे चांगल्या रेल्वे स्थानक स्वच्छ व सुंदर बाग असलेल्या स्थानकावर आहोत .येणाऱ्या काळात किंग्स रेल्वेस्थानकावर एक सुंदर अशी बाग पाहण्यासाठी नागरिक येथील अशी आशा आहे.त्यामुळे मला समाधान आहे .

लायन्स क्लब सायन चे नूतन
अध्यक्ष राकेश सिंग प्राध्यापक
एमएमपी शहा महिला कॉलेज माटुंगा यांनी महाविद्यालयातील एनएसएस युनिट च्या सोबतीला घेऊन हे काम पुढे चालू ठेवले महाविद्यालयातील विद्यार्थिनीं रेल्वे स्टेशन वर सतत वेळे नुसार कार्य करत भिंतीला रंगरंगोटी देने झाडांची वाढ होत आहे की नाही हे पाहत असायच्या आज येथे ही सुंदर अशी बाग बनवली आहे. या बागेला पाहून स्थानिक व प्रवासी स्टेशन मास्टरांची स्वच्छता व काम करण्याची पद्धत याला दाद देतात .आज ह्या स्थानकावर स्थानिक रहिवाशी महिला ज्येष्ठ नागरिक सायंकाळी फिरायला येतात त्यांना येथे स्वच्छ व सुंदर असे वातावरण पाहायला मिळते त्यामुळे अस्वच्छ असलेले हार्बर मार्गावरील किंग्स सर्कल रेल्वे स्थानक खरंच किंग सारखे भविष्यात दिसणार आहे.
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.