नवी मुंबई - महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात परराज्यातून गुटखा वाहतूक सुरु आहे. पनवेल परिसरात गुटखा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकूटाला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक देवीदास सोनावणे यांनी कारवाई करत लाखो रूपये किंमतीचा गुटखा टेंपोसह हस्तगत केला आहे.
सुकापूर एक्सप्रेस वे पूलाखाली काही व्यक्ती बेकायदेशीररित्या गुटखा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त मिळाीली होती. सोनावणे यांच्या मार्गदर्शनात पथकाने सापळा रचून आरोपी पुरणदास वैष्णव, दिपक गोड आणि प्रभुदयाल मारवाडी यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून महिंद्रा कंपनीचा टेंपो आणि बेकायदेशीर गुटखा 4,43,100 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
खांदा वसाहत परिसरात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर धंदे, मटका, जुगार, गुटखा विक्री, दारू विक्री, दादागिरी, खंडणी आदी प्रकार चालू देणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना या प्रकाराबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - ओडिशाच्या एका गावात एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या