ETV Bharat / state

Hitguj Helpline In Mumbai : आत्महत्येपासून परावृत्त करणासाठी केईएम रुग्णालयात हितगुज हेल्पलाइन

गेल्या वर्षभरात राज्यात 28 हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक कारणांनी पुरुष आणि स्त्रियांनी आपले आयुष्य आत्महत्येच्या विचाराने संपवले आहे. असा विचार मनात आल्यास मुंबईत हितगुज, दिलासा, प्रेरणा आणि वास्तव अशा सामाजिक संस्था हेल्पलाइनद्वारे आत्महत्येपासून परावर्तन करण्यासाठी मदतीचा हात देत आहेत.

Hitguj Helpline In Mumbai
केईएम रुग्णालयात हितगुज हेल्पलाइन
author img

By

Published : Jan 21, 2023, 9:19 PM IST

हेल्पलाईनविषयी माहिती सांगताना संस्थापक

मुंबई : मुंबईत केईएम रुग्णालयात मानसशास्त्रीय विभागात हितगुज 022-24131212 हेल्पलाइन चालवली जाते. तसेच या विभागात येणाऱ्या रुग्णांना समुपदेशन केले जाते. वांद्रे येथे भाभा रुग्णालयात दिलासा सेंटर येथून रुग्णांना मदत केली जाते. तसेच वास्तव फाउंडेशन तर्फे समुपदेशन उपलब्ध करुन दिल्या जाते.

पुरुषांच्या आत्महत्या दुप्पट : पुरुषांचे आरोग्य महिलांपेक्षा कमी असते. वयोमानानुसार गंभीर असे आजार होतात. सक्तीने शाळा सोडण्याचे प्रमाणही पुरुषांमध्ये जास्त आहे. घरगुती हिंसाचारात खोट्या केसेस होतात. पुरुषाची चुकीची प्रतिमा समाजात निर्माण केली जाते. अनेक कारणाने आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा दुप्पट आहे.

आत्महत्येची कारणे : कौटुंबिक अत्याचार, लैंगिक शोषण, सामाजिक अत्याचार, विवाह किंवा प्रेम प्रकरणात फसवणूक, संशय घेणे, अंधश्रद्धा, नोकरी धंद्यातील नैराश्य, वेड लागणे अशी अनेक कारणे आत्महत्या करण्यामागे असतात. तर खोट्या गुन्हा अडकवणे, विनयभंग, लैंगिक छळ, बलात्कार, स्टॉकिंग, वैवाहिक संबंधात पोलीस तक्रार अशा तक्रारींमध्ये पुरुषांनी आयुष्य उध्वस्त होत असल्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकतर्फी प्रेम किंवा प्रेमातील वियोगामुळे तरुणांना जास्त आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

धक्कादायक वास्तव : वास्तव फाउंडेशनचे संस्थापक अमित देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्या करण्याची संख्या खूप अधिक आहे. पंचेचाळीस हजार महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे.

हेही वाचा : Bageshwar Dham Maharaj: बागेश्वर धाममध्ये येतात भूत, प्रेतांची बाधा झालेल्या महिला व पुरुष.. मग होतं 'असं' की..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.