बेळगाव - कन्नड समर्थकांनी चंद्रकांत पाटील तसेच शंभूराजे देसाई यांच्या बेळगाव दौऱ्याला विरोध ( Oppose To Belgaum Visit ) केला आहे.महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई ६ डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत. त्याविरोधात कन्नड समर्थक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
बेळगावात जाण्यापासून रोखता येणार नाही - विषयावर महाराष्ट्र, कर्नाटक निर्णय घेऊ शकत नाही. हा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबीत आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे . आपला देश स्वतंत्र आहे. देशातील नागरिक कोणत्याही भागात जाऊ शकतो, त्याच्या अधिकारांवर कर्नाटक सरकारला बंधने आणता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. तसेच या प्रकरणी अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.