ETV Bharat / state

...म्हणून कंगनाला मुंबई  महापालिका 'होम क्वारंटाइन' करणार नाही

author img

By

Published : Sep 9, 2020, 10:01 PM IST

अभिनेत्री कंगना रणौत ही सात दिवसाच्या आत मुंबईतून परत जाणार असल्याने मुंबई महापालिका तिला होम क्वारंटाइन करणार नाही.

कंगना रणौत
कंगना रणौत

मुंबई - मुंबईबाबत वादग्रस्त विधान करणारी सिने अभिनेत्री कंगना रणौत आज (दि.9 सप्टें) दुपारी मुंबईत आली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विमानाने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला नियमाप्रमाणे 14 दिवस होम क्वारंटाइन केले जाते. मात्र, कंगनाने आपण मुंबईत जास्त दिवस राहणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तीला होम क्वारंटाइन केले जाणार नसल्याचे मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कंगना रणौतने मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे का असा प्रश्न उपस्थित करून मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. तसेच मी मुंबईत येत असून कोणाच्या बापात दम असेल तर मला रोखून दाखवावे, असे खुले आव्हान मुंबई आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिले होते. याचा निषेध पालिका आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने केला आहे. कंगनाकडून करण्यात येणाऱ्या ट्विटवरून कंगना विरुद्ध शिवसेना असा 'सामना' रंगला होता.

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील पाली हिल परिसरातील नर्गिस रस्त्यावरील 'मणीकर्णिका' या कार्यालयात मंगळवारी (दि. 8 सप्टें.) बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी नोटीस बजावली होती. या नोटीसीला कंगना व तिच्या वकिलांनी योग्य उत्तर दिले नसल्याने व हे बांधकाम कायदेशीर असल्याचे सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे या बांधकामावर आज तोडक कारवाई करण्यात आली.

दरम्यान, आज दुपारी कंगना हिमाचल प्रदेश येथील मनाली येथून चंदीगडमार्गे मुंबईत विमानाने दाखल झाली. कंगनाने चंदीगड ते मनाली असा विमानाने प्रवास केला होता. यासवच तिने आपली कोरोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे मुंबई महापालिका कंगनाला क्वारंटाइन करणार का अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र, आपण मुंबई सहा दिवसासाठीच आले असून पुन्हा परत जाणार असल्याचे कंगनाने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार कंगनाला होम क्वारंटाइन करणार नसल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काय आहे नियम

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने एखाद्या व्यक्तीने विमान प्रवास केल्यास त्याची विमानतळावर तपासणी करून 14 दिवस होम क्वारंटाइन केले जाते. जर संबंधित व्यक्तीने आपण 7 दिवसात परत जाणार असल्याचे स्पष्ट केल्यास त्याला होम क्वारंटाइनमधून सूट दिली जाते. एखादा सरकारी अधिकारी किंवा व्यक्ती अतिमहत्वाच्या कामासाठी मुंबईत येण्यापूर्वी पालिकेला तसे आधीच कळवल्यास क्वारंटाइनमधून सूट दिली जाते.

हेही वाचा - कंगनाचे कार्यालय कायदेशीर, त्यावरील कारवाई बेकायदेशीर - कंगनाचे वकील सिद्दीकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.