ETV Bharat / state

कौतुकास्पद! मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये 'जोकर' करतो सॅनिटायझेशन

मुंबईतल्या सांताक्रुज येथील पोस्टल कॉलनीमध्ये हा तरुण राहतो. मार्च 2019 पासून कोरोनाचा काळा सुरु झाला. याच काळात सरकार आप आपल्यापरीने काम करत होते. त्यातच अशोक कुर्मी यांनी देखील स्वत: पुढाकार घेऊन सॅनिटाझेशनचे काम सुरु केले. कुर्मी यांनी आतापर्यंत 1.5 ते 2 लाख घरांचे निर्जंतुकीकरण केले आहेत.

'जोकर' करतो सॅनिटायझेशन
'जोकर' करतो सॅनिटायझेशन
author img

By

Published : Jun 6, 2021, 6:16 PM IST

Updated : Jun 6, 2021, 7:57 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला जनतेने प्रतिसाद दिला आणि लाट ओसरण्यास मदत होऊ लागली. मात्र असे असताना या कोरोनामुळे अनेक ठिकाणी निराशेचे वातावरण दिसून येत आहे. अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेक जणांनी आपल्या आप्तेष्टांना या कोरोना काळात गमावले आहे. या सगळ्या निराशेच्या वातावरणात जनतेमध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी मुंबईतल्या एका तरुणाने पुढाकार घेत, वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.

वस्त्यांमध्ये 'जोकर' करतो सॅनिटायझेशन

एका फार्मा कंपनीमध्ये काम करणाऱ्या अशोक कुर्मी नावाच्या तरुणाने हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतल्या सांताक्रुज येथील पोस्टल कॉलनीमध्ये हा तरुण राहतो. मार्च 2019 पासून कोरोनाचा काळ सुरु झाला. याच काळात सरकार आपल्यापरीने काम करत होते. त्यातच अशोक कुर्मी यांनी देखील स्वत: पुढाकार घेऊन सॅनिटाझेशनचे काम सुरु केले. कुर्मी यांनी आतापर्यंत 1.5 ते 2 लाख घरांचे निर्जंतुकीकरण केले आहेत. हे करत असताना कुर्मी सांगतात, सुरुवातीच्या काळात पीपीई कीट घालून घरांचे निर्जंतुकीकरण करत होतो. पीपीई कीट पाहून लहान मुले घाबरत होती. यावर उपाय म्हणून कार्टूनच्या कॅरेक्टरेची वेशभूषा करुन जेव्हा सॅनिटायझेशनचे काम सुरु केले, तेव्हा ते लहान मुलांना आवडू लागले. मी स्वच्छतेचे संदेश देत होतो ते संदेश मुलं फॉलो करायला लागली. हा परिणाम दिसून आला. तसेच या काळात लहान मुलांना शिक्षण उपयोगी वस्तूंची देखील उपलब्धता करुन दिल्याचे कुर्मी सांगतात.

अशोक कुर्मी वावरतात जोकरच्या वेशात

अशोक कुर्मी यांनी जोकरचा वेश परिधान करुन मुंबईच्या अनेक भागात सॅनिटायझेशन केले आहे. अशोक कुर्मी सांगतात, 'या दोन्ही लाटेत जनतेच्या मनात फार निराशा निर्माण झाली आहे. नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. जेव्हा मी जोकरचा वेश धारण करुन घराच्या बाहेर पडलो, तेव्हा लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक हसू आले. हसणे ही सकारात्मक भावना आहे. जोकर सर्वांना हसवतो आणि संदेश देखील देतो. तसेच मी जोकरच्या वेशात सॅनिटायझेशन करतो. लहान मुलांना स्वच्छतेचा संदेश देण्याचे देखील काम करतो. मुळात या जोकरच्या ड्रेसमुळे जी मुले मागास भागात राहात आहेत. ती मुले मला पाहून जवळ येतात. त्यामुलांना हात कसे धुवावे. सामाजिक अंतर कसे ठेवावे याच्या सूचना मी करत असतो.

'या' वेशात दिलाय स्वच्छतेचा संदेश

अशोक कुर्मी यांनी यांनी सुरुवातील मिकी माऊसचा वेशपरिधान करुन मुंबईतील अनेक परिसर निर्तंजुकीकरण केले आहेत. त्यानंतर स्पायडर मॅन आणि सांताक्लॉजचा वेश परिधान करुन परिसर सॅनिटाइझ केला आहे. अशोक कुर्मी सांगतात की, स्पायडर मॅनचा वेश परिधान करुन बिल्डिंग सॅनिटायझ करत असताना एक लहान मुलगा देखील स्पायडर मॅनचा वेश परिधान करुन समोर उभा राहिल्याचे सांगितले आहे.

तिसऱ्या लाटेसंदर्भात अशोक कुर्मींचे मत

कुर्मी सांगतात, की जोकरचा वेश परिधान करण्याची आयडिया तिसऱ्या लाटेसाठी आली होती. पुढील तीन ते चार महिने हा वेश परिधान करुन स्वच्छतेचा संदेश देणार आहे. सरकारने दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना कुर्मी यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा-सांगलीत व्याख्यानामधून कोरोना रुग्णांना जगण्याची नवी उर्मी देणारा अवलिया

Last Updated : Jun 6, 2021, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.