ETV Bharat / state

अमोल कोल्हेंच्या गाडीवर 15 चलन, 'इतका' दंड येणं बाकी; 'त्या' आरोपांना पोलिसांनीच दिलं प्रत्युत्तर

Amol Kolhe Exposes Traffic Police Recovery : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पोस्ट शेयर करत राज्य सरकार तसेच वाहतूक पोलीस विभागावर गंभीर आरोप केले होते. यावर आता खुद्द वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनीच स्पष्टीकरण दिलंय. काय आहे नेमकं प्रकरण वाचा...

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 6:38 PM IST

मुंबई Amol Kolhe Exposes Traffic Police Recovery : खासदार अमोल कोल्हे यांनी 'एक्स'वर एक पोस्ट शेयर केली होती. सरकारकडून पोलिसांच्या वाहतूक विभागाला वसुली गोळा करण्याचे टार्गेट दिले जात असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला होता. तसेच किती वसुली केली जाते याची आकडेवारीच कोल्हे यांनी जाहीर केली होती. यावर वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ (Joint CP Pravin Padwal) यांनी थेट अमोल कोल्हे यांच्या गाडीवर किती चलन आणि किती दंड बाकी आहे याची आकडेवारीच 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना जाहीर केली.

अमोल कोल्हे यांच्याकडं असलेल्या वाहनावर 15 चलन बाकी असून, त्यांची 16 हजार नऊशे रुपयांची रक्कम येणे बाकी आहे - प्रवीण पडवळ, सहपोलीस आयुक्त, वाहतूक शाखा मुंबई

कोल्हे यांची माहिती चुकीची - सहपोलीस आयुक्त : या संदर्भात वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, खासदार अमोल कोल्हे यांनी चुकीची माहिती सोशल मीडियावर शेयर केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नेहमीच दंड आकारला जातो. त्याबाबत कोणालाही टार्गेट दिलं गेलेलं नाही. मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन केलेल्या 1.31 कोटींपेक्षा अधिक ई-चलानमधील वाहनांकडून जानेवारी 2019 पासून 685 कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित आहे. ही दंडणीय रक्कम शासन जमा करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार आणि रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहीम हाती घेण्यात येते.

व्हिडिओत खासदार कोल्हे काय म्हणाले : खासदार कोल्हे यांनी आरोप करताना व्हिडिओत म्हटले आहे की,, आपण मुंबईतून जात असताना एका चौकात एका महिला पोलीस भगिनीने आपल्याला अडवले. तसेच काहीतरी कारण सांगून ड्रायव्हरला दंड भरण्यास सांगितले. याबाबत आपण सदर महिला पोलिसाला विचारले असता त्यांनी आपल्याला ओळखल्यानंतर वरिष्ठांकडून आलेला मेसेज दाखवला. प्रत्येक चौकामध्ये पंचवीस हजार रुपये दंड वसूल झालाच पाहिजे, अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आल्याचं त्या महिला पोलीस भगिनीने सांगितले. तो मेसेज पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसला. एका चौकात जर पंचवीस हजार रुपये वसुलीचे निर्देश असतील तर प्रत्येक चौकातील वसुली पाहता किती रुपये हे सरकार वाहनधारकांकडून घेणार आहे? याचा अंदाज येईल. सदर महिला पोलीस भगिनीचे आपण नाव अथवा तिची ओळख उघड करणार नाही. मात्र, या घटनेने आपल्याला धक्का बसला असून सरकारने सर्वसामान्य जनतेची लूट थांबवावी. तसेच याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही खासदार कोल्हे यांनी केली आहे.

कोल्हे यांनी सादर केलेली आकडेवारी : यासंदर्भात मुंबईत ६५२ ट्राफिक जंक्शन्स आहेत, ज्याची 25 हजार रुपये प्रत्येक दिवशी जर पाहिलं तर एक कोटी 63 लाख रुपयांचा दंड दररोज वसूल होतो. जर एकट्या मुंबईत एवढा दंड वसूल होत असेल तर अन्य शहरांचं काय? असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात संबंधित मंत्रीमहोदय अथवा अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, वाहतूक शाखेचा उपयोग नियमनापेक्षा वसुलीसाठी होतो का? याची जनतेला माहिती मिळावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितला सिग्नलवरील धक्कादायक अनुभव
  2. मोदींनी सिंचन घोटाळ्याचे आरोप कुणावर केले, शरद पवारांचा सवाल, अजित दादा प्रफुल पटेलांच्या दाव्यांचा घेतला समाचार
  3. अजित पवारांचे गौप्यस्फोट; शरद पवारांनी दिलं थेट उत्तर, म्हणाले 'मी पहिल्यांदाच ऐकलं'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.