ETV Bharat / state

Job in Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलात नोकरी; २१ ते ६९ हजारांपर्यंत पगार मिळवण्याची संधी - पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

मुंबई अग्निशमन दलात गेले काही वर्षे भरती प्रक्रिया रखडली होती. यासाठी ऑगस्ट महिन्यात ९१० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध (Advertised to fill up posts) करण्यात आली होती. मात्र अल्प प्रतिसाद मिळाल्याने आज पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Job in Mumbai Fire Brigade) यामुळे बेरोजगारांना अग्निशमन दलात २१ ते ६९ हजारांपर्यंत पगार मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. (Opportunity to earn salary from 21 to 69 thousand )

Job in Mumbai Fire Brigade
मुंबई अग्निशमन दलात नोकरी
author img

By

Published : Dec 30, 2022, 10:36 AM IST

मुंबई : मुंबई अग्निशमन दल हे जगात नावाजलेले दल आहे. (Job in Mumbai Fire Brigade) आगीच्या घटना, घरे इमारती दरडी कोसळणे, नाल्यात समुद्रात बुडणे आदी सर्वच आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव करण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलात २५०० पदांपैकी तब्बल ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गावर मोठा ताण येतो. त्यामुळे अग्निशामकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Opportunity to earn salary from 21 to 69 thousand )मात्र गेले कित्तेक वर्षे ही भरती रखडलेली होती. आज पुन्हा एकदा ९१० पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेव्ही ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत. (Fire brigade recruitment )

यांना भरतीत आरक्षण : भूकंपग्रस्त, दिव्यांनी, खेळाडू , महिला, प्रकल्प बाधित, माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून वाॅक इन सिलेक्शन पद्धतीने भरती होणार आहे. भरतीत ३० टक्के महिलांना आरक्षण असून २७३ पदांची भरती होणार आहे. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल. (Advertised to fill up posts)

अशी राबवणार भरती प्रक्रिया : सध्या वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मेरिटनुसार अग्निशामकांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी ८०० मीटर धावणे, डमी बॉडी घेऊन पळणे, रोफवर चढणे आदी चाचण्या होणार आहेत.

केंद्रीय रेशीम मंडळात देखील सरकारी नोकरीची संधी : सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार करिअर विभागात सक्रिय केलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून अधिकृत वेबसाइट, csb.gov.in वर ऑनलाइन अर्ज पृष्ठास भेट देऊ शकतात. प्रथम नोंदणी उमेदवारांना अर्ज प्रक्रिया प्रक्रियेअंतर्गत करावी लागेल. यानंतर उमेदवारांना नोंदणीकृत तपशिलांसह लॉग इन करावे लागेल आणि संबंधित पदासाठी त्यांचा अर्ज सबमिट करावा लागेल. अर्जादरम्यान, उमेदवारांना गट अ पदांसाठी 1000 रुपये, गट बी आणि सी पदांसाठी 750 रुपये ऑनलाइन माध्यमातून भरावे लागतील. तथापि, SC, ST, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. अर्ज प्रक्रिया 24 डिसेंबरपासून सुरू झाली असून उमेदवार 16 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.