मुंबई : पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत बोलताना एक वक्तव्य केले होते. यासंदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात पुन्हा एकदा ट्विट केले. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा, असे ते म्हणाले. भाजपचे राज्यात सरकार असताना शिक्षण मंत्री विनोद तावडे होते. मुघलांचा इतिहासच पाठ्यपुस्तकातून काढण्याचा प्रयत्न त्यावेळी सुरू होता. मुघलांचा इतिहासच काढला तर छत्रपती शिवाजी महाराज काय गोट्या खेळत होते का? असे दाखवणार का? अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी त्या कार्यक्रमादरम्यान केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांकडून आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आहे.
-
रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा.
बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा#आवाज_बहुजनांचा_सन्मान_महाराष्ट्राचा
">रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2023
दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा.
बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा#आवाज_बहुजनांचा_सन्मान_महाराष्ट्राचारावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2023
दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा.
बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा#आवाज_बहुजनांचा_सन्मान_महाराष्ट्राचा
आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडले: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलत असतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळेच ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. अशी वादग्रस्त वक्तव्ये करूनही उद्धव ठाकरे हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले आहेत.
वादग्रस्त वक्तव्यांची मालिका: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिका सुरू आहे. याचे पडसाद वेळोवेळी उमटताना देखील पाहायला मिळाले. हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनीही महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्र सहित अधिवेशनात देखील उमटले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतच्या वक्तव्याचा निषेध भाजपकडून करण्यात येत आहे.