ETV Bharat / state

Jitendra Awhad : रामनवमी, हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच, जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुन वाद पेटण्याची चिन्ह आहेत. मनवमी, हनुमान जयंती फक्त दंगल घडवण्यासाठीच का? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शिबिरात बोलतांना केला होता. त्यावरुन भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर हिंदू सणांचा अवमान केल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे.

author img

By

Published : Apr 22, 2023, 10:51 PM IST

Jitendra Awhad
Jitendra Awhad

मुंबई : रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील इतर भागात उसळलेल्या दंगलीच्या घटनांबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. रामनवमी, हनुमान जयंती केवळ राज्यात दंगल घडवण्यासाठी असल्याचे दिसते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी दंगलीच्या घटनांवरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली. रामनवमीला संभाजीनगरमध्ये दंगल झाली. राम नवमी, हनुमान जयंतीला, दंगली नेहमीच होतात. सत्ताधारी युवकांना नोकरी देऊ शकत नाही. राज्यातील महागाई कमी करता न आल्याने सत्ताधाऱ्यांना धार्मिक कार्यक्रम करून मते मिळवण्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.

  • On his earlier remarks regarding violence on Ram Navami, NCP leader Jitendra Awhad says,"Lord Ram is 'Karuna-purush'. During childhood, we saw Lord Ram with Lord Laxman & Goddess Sita but...I didn't say riots take place on Ram Navami, I said that such such atmosphere was created" pic.twitter.com/2x33KBkHx6

    — ANI (@ANI) April 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आव्हाडांच्या वक्तव्यावर टीका : शिंदे गटनेते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड हे कट्टर हिंदुद्वेषी नेते असल्याचे या विधानावरून सिद्ध होते, असे ते म्हणाले. तसेच जितेंद्र आव्हाड हे आगामी वर्ष जातीय दंगलींनी भरलेले असेल असे ठासून सांगत असतील तर ते राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • It seems that the festivals of Ram Navami and Hanuman Jayanti are for riots only. The atmosphere in the cities has deteriorated due to riots. I think the coming years will be the years of religious riots: NCP leader Jitendra Awhad in Mumbai today pic.twitter.com/JirBUGvMZ5

    — ANI (@ANI) April 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ? देशात द्वेषाचे राजकारण वाढत आहे, तेलंगणातील आमदार महाराष्ट्रात येऊन मुस्लिमांबद्दल वाट्टेल ते बोलतात. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, महाराष्ट्र हे सरकार नपुसंक आहे. रामनवमी, हनुमान जयंती फक्त दंगलीसाठी झाली की काय? असे वाटत असे वक्तव्य अव्हाढ यांनी केले होते. सामजीक वातावरण पूर्वीपेक्षा वाईट झाले आहे. येणारे वर्ष हे जातीय दंगलींचे असेल. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाही. नोकऱ्या देऊ शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही, धार्मिक समारंभ करणे, त्या समारंभांतून मते गोळा करणे आता सोपे झाले आहे. मत पेटीवर लक्ष ठेऊन राज्यात विंधवस करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अव्हाढ यांनी केला होता. दंगलीचे नियोजन कसे होते ते मी पाहिले आहे. मी उभे राहण्याचा अनुभव घेतला आहे. मला कोणीही दंगल समजू नये, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

हेही वाचा - Amruta Fadnavis On Ajit Pawar : अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाबाबत विधान; अमृता फडणवीस थेटच म्हणाल्या...पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.