ETV Bharat / state

महाराष्ट्रात राजकीय मग्रूरीचा अंत, जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा - महाराष्ट्रात राजकीय मग्रूरीचा अंत

महाराष्ट्रात भाजपला पराभूत करुन आपण राजकीय मग्रूरीचा अंत केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. भाजप पराभूत होऊ शकत नाही, ही मानसिकता आपण बदलून टाकल्याचे आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा
author img

By

Published : Nov 27, 2019, 5:07 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात भाजपला पराभूत करुन आपण राजकीय मग्रूरीचा अंत केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. भाजप पराभूत होऊ शकत नाही, ही मानसिकता आपण बदलून टाकल्याचे आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला. शरद पवार यांनी राज्यात भाजप विरोधी वातावरण निर्मिती केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येण्यास मदत झाल्याचे आव्हाड म्हणाले. देशात एका नव्या आघाडीचा जन्म होत असून, भाजपला पराभूत करने शक्य असल्याचे महाराष्ट्राने दाखवून दिल्याचे आव्हाड म्हणाले. ज्याला जे काही बोलायचे ते बोला जे काही अनुमान काढायचे ते काढा. निष्ठेशी तडजोड नाही म्हणजे नाहीच. मरेपर्यंत पवार साहेबांबरोबर राहणार असल्याचे आव्हाड म्हणाले.

गेल्या एका महिन्यापासून राज्यात नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. सत्ता स्थापनेवरुन शिवसेना भाजपमध्ये रसस्सीखेच असल्याचे पाहायला मिळाले होते. पण अखेर शिवसेनेने बाजी मारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला. आता उद्या (गुरुवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

Intro:Body:

महाराष्ट्रात राजकीय मग्रूरीचा अंत, जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

मुंबई -  भाजप पराभूत होऊ शकत नाही, ही मानसिकता आपण बदलून टाकली आहे. भाजपला पराभूत करू शकतो ही दिशा महाराष्ट्राने दाखवली आहे. महाराष्ट्रात भाजपला पराभूत करुन आपण राजकीय मग्रूरीचा अंत केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला. शरद पवार यांनी राज्यात भाजप विरोधी वातावरण निर्मिती केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येण्यास मदत झाल्याचे आव्हाड म्हणाले. देशात एका नव्या आघाडीचा जन्म होत असून, भाजपला पराभूत करने शक्य असल्याचे महाराष्ट्राने दाखवून दिल्याचे आव्हाड म्हणाले. ज्याला जे काही बोलायचे ते बोला जे काही अनुमान काढायचे ते काढा. निष्ठेशी तडजोड नाही म्हणजे नाहीच. मरेपर्यंत पवार साहेबांबरोबर राहणार असल्याचे आव्हाड म्हणाले.

गेल्या एका महिन्यापासून राज्यात नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. सत्ता स्थापनेवरुन शिवसेना भाजपमध्ये रसस्सीखेच असल्याचे पाहायला मिळाले होते. पण अखेर शिवसेनेने बाजी मारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला. आता उद्या (गुरुवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.