मुंबई - माजी मंत्री, भाजप नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. या २ नेत्यांमध्ये सध्या चांगलेच राजकीय घमासान सुरु आहे. गणेश नाईकांच्या रक्तातच गद्दारी असल्याचे ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांनी नाईकांना लक्ष्य केले आहे.
2014 लाच गणेश नाईक यांच्या मनात गद्दारीचा विचार आला आणि 2019 ला तो जुळून आला, असा खोचक टोलाही आव्हाड यांनी लगावला. शहा आणि मोदी हे गुंड आहेत आणि लुटारू आहेत ते देशातून पळून जातील असं म्हणणारे गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी इमानदार राहतील. गद्दारी त्यांच्या रक्तातच आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
-
2014 लाच त्यांच्या मनात गद्दारीचा विचार आला आणि 2019 ला तो जुळून आला.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
शहा आणि मोदी हे गुंड आहेत आणि लुटारू आहेत ते देशातून पळून जातील असं म्हणणारे गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी इमानदार राहतील.
गद्दारी रक्तात आहे #गद्दार_गणेशनाईक
">2014 लाच त्यांच्या मनात गद्दारीचा विचार आला आणि 2019 ला तो जुळून आला.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 8, 2020
शहा आणि मोदी हे गुंड आहेत आणि लुटारू आहेत ते देशातून पळून जातील असं म्हणणारे गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी इमानदार राहतील.
गद्दारी रक्तात आहे #गद्दार_गणेशनाईक2014 लाच त्यांच्या मनात गद्दारीचा विचार आला आणि 2019 ला तो जुळून आला.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 8, 2020
शहा आणि मोदी हे गुंड आहेत आणि लुटारू आहेत ते देशातून पळून जातील असं म्हणणारे गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी इमानदार राहतील.
गद्दारी रक्तात आहे #गद्दार_गणेशनाईक
काय म्हणाले होते आव्हाड
नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना आव्हाडांनी गणेश नाईकांना प्रथम लक्ष्य केले होते. नाईक गणेश नाईक हे खंडणीखोर आहेत. त्यांनी स्वतः ला मोठे केले. परंतू, दुसऱ्या कोणालाही मोठे होऊ दिले नाही. नवी मुंबईतील राजकारणामध्ये आमदार मंदा म्हात्रे व विजय चौगुले यांनी गणेश नाईकांमुळेच राष्ट्रवादी सोडली. एवढेच नाही तर गणेश नाईक यांनी आपल्या मुलाच्या तिकिटावर स्वतः उभे राहून त्यांचा राजकीय बळी घेतल्याची खोचक टीका देखील आव्हाडांनी केली होती.
आव्हाडांच्या टीकेनंतर काय म्हणाले गणेश नाईक
आव्हाड यांच्या टीकेला उत्तर देताना गणेश नाईक म्हणाले की, 'ये तेरे बस की बात नही... तेरे बाप को बोल', असा खोचक टोला नाईकांनी आव्हाडांना लगावला होता. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.