ETV Bharat / state

आयएएस अधिकारी निधी चौधरींनी तत्काळ सेवेतून बडतर्फ करा - जितेंद्र आव्हाड

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. निधी चौधरी यांनी एक ट्विट करून महात्मा गांधी यांचे खुनी गोडसे यांना धन्यवाद दिले आहेत.

निधी चौधरींनी तत्काळ सेवेतून बडतर्फ करा - जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jun 1, 2019, 7:27 PM IST

मुंबई - आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह असे ट्विट केले होते.

निधी चौधरी यांनी एक ट्विट करून महात्मा गांधी यांचे खुनी गोडसे यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच देशात आणि जगभरात महात्मा गांधीचे जिथे-जिथे पुतळे आहेत किंवा विविध ठिकाणी देण्यात आलेली त्यांची नावे काढण्यात यावी. भारतीय चलनावर असलेले त्यांचे चित्र काढण्यात यावे अशी मागणी करणारे ट्विट चौधरींनी केले होते. त्यावर आव्हाड यांनी जोरदार आक्षेप घेत अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना सरकारने तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

निधी चौधरींनी तत्काळ सेवेतून बडतर्फ करा - जितेंद्र आव्हाड

भारतीय सेवेत दाखल होत असताना महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर राखणे अत्यावश्यक असतानासुद्धा चौधरी यांनी ट्विट करून त्यांचा अनादर केला आहे. त्यांच्यावर सरकारने विविध कलमातंर्गत कारवाई करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

mumbai
निधी चौधरींनी केलेले ट्विट

दरम्यान, निधी चौधरी यांनी केलेले हे ट्विट जुने असून, आपण केलेले हे ट्विट काही दिवसांपूर्वीच डिलीट केले असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. मात्र, अशाप्रकारचे दावा करणे हे खोटारडेपणा असल्याचे आव्हाड म्हणाले.

Intro:निधी चौधरी या आयएएस अधिकारी महिलेला सेवेतून तात्काळ बडतर्फ करा- जितेंद्र आव्हाड

Body:निधी चौधरी या आयएएस अधिकारी महिलेला सेवेतून तात्काळ बडतर्फ करा- जितेंद्र आव्हाड

मुंबई, ता. 1 :

भारतीय सेवेत कार्यरत असताना देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह असे ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज केली.
निधी चौधरी यांनी एक ट्विट करून महात्मा गांधी यांच्या खुन्याला धन्यवाद दिले आहेत. त्यात त्यांनी गोडसे यांना धन्यवाद व्यक्त करत देशात आणि जगभरात महात्मा गांधीचे जिथे जिथे पुतळे अथवा विविध ठिकाणी देण्यात आलेले त्यांचे नावे काढण्यात यावी तसेच भारतीय चलनावर असलेले त्यांचे चित्र काढण्यात यावे अशी मागणी करणारे ट्विट केले होते.त्यावर आव्हाड यांनी जोरदार आक्षेप घेत अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना सरकारने तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली.

भारतीय सेवेत दाखल होत असताना राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर राखणे अत्यावश्यक असतानासुद्धा चौधरी यांनी ट्विट करून त्यांचा प्रचंड अनादर केला असून त्याविषयी त्यांच्यावर सरकारने विविध कलमाच्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, निधीचे चौधरी यांनी केलेले हे ट्विट जुने असून त्यासंदर्भात त्यांनी आपण हे ट्विट काही दिवसांपूर्वीच डिलीट केले असल्याचा दावा एका दुसऱ्या ट्विटमध्ये चौधरी यांनी केला आहे. मात्र अशाप्रकारचे दावा करणे हे खोटारडेपणाचे असून अगोदर गुन्हा करायचा आणि त्याला मी केला नाही असे सांगायचा प्रयत्न करायचा हा खोटारडेपणा चौधरी यांनी केला असून त्यांच्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणीही आव्हाड यांनी आज केली.

Conclusion:निधी चौधरी या आयएएस अधिकारी महिलेला सेवेतून तात्काळ बडतर्फ करा- जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.