मुंबई - मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. आवर्जुन मतदान करा, असे आवाहन अभिनेते जयंत वाडकर यांनी केले आहे. त्या सोबतच मतदान चुकवून पिकनिक आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी असेही वाडकर यांनी म्हटले आहे.
मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच, जे लोक मतदान करणं टाळतात किंवा मतदानाच्या दिवशी मतदान करण्याएवजी बाहेर फिरतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
मुंबईत सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाचा आकडा हा कमी होता. त्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. त्यामुळे मतदारांनी आवर्जुन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.