ETV Bharat / state

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करा; जयंत पाटलांची मुख्यमंत्र्याकडे मागणी - mumbai latest news

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. अण्णाभाऊ साठे हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. कथाकार, पटकथाकार, शाहीरी, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. त्यांनी देशाचे नाव सातासमुद्रापार उंचावले आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

jayant patil
जयंत पाटील
author img

By

Published : Aug 1, 2020, 2:50 PM IST

मुंबई- साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे त्याबाबत शिफारस करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल, अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

अण्णाभाऊ हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. कथाकार, पटकथाकार, शाहिरी, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. अण्णाभाऊंनी विश्व साहित्यात आपला ठसा उमटवला, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला स्तालिनग्राडचा पोवाडा रशियात प्रचंड गाजला. अण्णाभाऊ यांची तुलना रशियन कांदबरीकार दोस्काव्होस्की यांच्याशी केली जाते. ज्यांनी सातासमुद्रापार देशाची मान उंचावली, त्या व्यक्तीचा सन्मान आपल्या मायभूमीत व्हायला हवा, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

अण्णाभाऊ यांचे साहित्य गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी वर्गाच्या हक्क-अधिकारांची जाणीव निर्माण करणारे आहे. त्यांच्या साहित्यातील नायक-नायिका सत्वशील, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणारे आहेत. समाजाची दुसरी बाजू दाखवणाऱ्या, त्याचे प्रश्न मांडणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळायलाच हवा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री जयंत पाटील यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. जयंत पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देऊन शिल्पशृष्टीची पाहणीही केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.