ETV Bharat / state

Jayant Patil : छगन भुजबळांचा फोटो मॉर्प करणार्‍या अतुल भातखळकरांवर कारवाई करा - जयंत पाटील - chhagan bhujbal wearing santa hat photo morph

विधानसभेत जयंत पाटील भाजप आमदार अतुल भातखळकरांवर कारवाईची मागणी ( jayant patil demand action on atul bhatkalkar ) केली . अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांचा फोटो मॉर्प करून त्यांना सॅंटाक्लोजची टोपी घातली होती. आणि हा फोटो ट्विटरवर पोस्ट ( chhagan bhujbal wearing santa hat photo morph ) केला. त्यावर फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींनी तारतम्य बाळगून पोस्ट कराव्यात, अशी सूचना केली.

jayant patil chhagan bhujbal   atul bhatkalkar
जयंत पाटील छगन भुजबळ अतुल भातखळकर
author img

By

Published : Dec 21, 2022, 5:20 PM IST

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो मॉर्फ करून ट्वीट केल्याबद्दल अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यानी विधानसभेत ( jayant patil demand action on atul bhatkalkar ) केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीने तारतम्य बाळगून पोस्ट कराव्यात, अशी सूचना केली.

chhagan bhujbal wearing santa hat
छगन भुजबळ यांना सॅंटाक्लोजची टोपी

फोटो सोशल मीडिया हँडलवर प्रसारित : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारीत केला. छगन भुजबळ यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न ( chhagan bhujbal wearing santa hat photo morph ) केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले. सभागृहातील सदस्यच दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून ( Chhagan Bhujbal Photo morph ) सोशल मीडियावर प्रसारित करून ट्रोल करत असतील तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांचे मोबाईलमधील ते छायाचित्र दाखवत हे अतिशय गंभीर आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

काय होता फोटो : छगन भुजबळ हे विधानभवनाच्या आवारात आमदार भैाई जगताप यांच्यासोबत चालत असतानाचा हा पोटो आहे. यात भुजबळ यांच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी घालून हा पहा सरस्वतीचा अपमान करणारा अस्सल सांताक्लॉज अशी टिप्पणी केलेली आहे. दरम्यान राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये त्यांनी सोशल मिडियावर संहिता पाळाव्यात असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.