ETV Bharat / state

विरोधकांवर मुद्दाम गुन्हे दाखल, शेतकऱ्यांसाठी राज्यभर निषेध मोर्चे काढणार - जयंत पाटील - Deliberately filed crimes against opponents

Jayant Patil Attacked On Shinde Government : राज्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पीक विम्याबाबत सरकारनं अनेक घोषणा केल्या. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही, ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil Attacked On State Government
जयंत पाटील यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 6:21 PM IST

जयंत पाटील यांची पत्रकार परिषद

मुंबई Jayant Patil Attacked On Shinde Government : राज्यात अवकाळी पाऊस तसंच दुष्काळामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाले असून, सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. राज्यात शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही राज्यभर निषेध मोर्चे काढणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचं पाटील यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी उद्या जळगाव जिल्ह्यात शेतकरी निषेध मोर्चा काढणार आहोत. मी त्या मोर्चाला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या नुकसानीचीही पाहणी करणार आहे. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

अवकाळी, दुष्काळामुळं शेतकऱ्यांवर संकट : पुढं बोलताना पाटील म्हणाले की, हिंगोली, वाशीम, यवतमाळ परिसरात अवकाळीमुळं तुरीचं पीक वाया गेलं आहे. मंचरसह पुण्यातील इतर भागात ज्वारीचं पीक उद्ध्वस्त झालं आहे. नंदुरबारमध्ये सुमारे पंचवीस-तीस हजार क्विंटल मिरची भिजली आहे. जळगाव, नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे.

उद्या जळगावमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा : शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही उद्या जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. मी स्वतः त्या मोर्चात सहभागी होणार आहे. तसंच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसानीची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. परवा नाशिक जिल्ह्यात दिंडोरीला मोर्चा काढणार आहोत. पाच तारखेला अमरावतीला मोर्चा काढणार आहे. तर, विदर्भातील त्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अमरावतीत मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिलीय.

जाणीवपूर्वक गुन्हे दाखल : मुख्यमंत्री मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणार का, असा प्रश्न पाटील यांना विचारला होता. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, सध्या त्यासाठी योग्य वातावरण नसल्यानं कृत्रिम पाऊस पाडता येणार नाही. हे तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगावं, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी एका पुलाचं उद्घाटन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन करून सरकारचं काम हलकं केलं आहे. पुलाचं उद्घाटन केल्यानंतर लोकप्रतिनिधींवर प्रथमच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. सत्तेतील लोकांनीही वादग्रस्त वक्तव्य केलीत, मग त्यांच्यावर कारवाई का नाही?, संजय राऊतांचा सवाल
  2. मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८१ कोटी कुटुंबांना होणार फायदा
  3. जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, हिवाळी अधिवेशन दहा दिवसातच गुंडाळणार - वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.