मुंबई - झारखंडमधील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थ क्षेत्राला ( Government Announced Sammed Shikharji As A Tourist Place ) झारखंड सरकारने पर्यटनस्थळ घोषित केल्याने राज्यात सकल जैन समाजाकडून संताप ( Jain Women Aggressive Against Government ) व्यक्त केला जात आहे. मुंबईत देखील याचे तीव्र पडसाद उमटले. जैन बांधवांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत, मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत मोर्चा ( Jain Women Aggressive In Mumbai ) काढाला. सरकारने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा जीवाची आहुती देऊ, पण तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ होऊ देणार नाही, असा एल्गार जैन बांधवांनी ( Jain Community Protest In Mumbai ) पुकारला. केंद्र सरकारने राजकीय फायद्यासाठी हा मुद्दा उचलल्याचा यावेळी आरोपही करण्यात आला आहे.
सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन आज जैन बांधवानी रस्त्यावर ( Jain Women Aggressive Against Government ) उतरुन सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला. नरेंद्र मोदींना पंतप्रधान ( Pm Narendra Modi ) पदापर्यंत जैन बांधवांनी नेले. आज तेच मोदी जैन धर्मियांचे तीर्थस्थळ हिसकावून पर्यटनस्थळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही ते होऊ देणार नाही. जैन धर्मियांनी सरकारकडे आजवर कधीही काही मागितले नाही. उलट सगळ्यांची मदत करण्याचे काम करत आलो. आज पंतप्रधान मोदींनी आमच्या तीर्थ स्थळाला हात घातला आहे. पर्यटनस्थळ बनवू नका, अशी विनंतीही जैन धर्मियांनी यावेळी केली.
तीर्थस्थळ जैन धर्मियांचे पवित्र स्थान आजवर हे तीर्थस्थळ जैन धर्मियांचे ( Jain Community Protest ) पवित्र स्थान आहे. तेथील माती, धरती पुजनीय आहे. भगवानाचा त्यात अधिवास आहे. त्यामुळे वेळप्रंसगी जीव देऊ, पण कोणत्याही परिस्थितीत पर्यंटन होऊ देणार नाही, असा इशारा जैन धर्मियांनी दिला. तसेच सरकारच्या निषेधार्थ मेट्रोपासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला आहे. तीर्थस्थळ रहावे, अशी आमची मागणी आहे. तीर्थस्थळाच्या रक्षणासाठी जैन बांधव रस्त्यावर आले असून पर्यंटनस्थळ बनवू नका, अशी मागणी असल्याचे पारस जैन यांनी सांगितले.
तीर्थस्थळ टीकवण्यासाठी विरोध करु, महिलांचा इशारा धर्म आणि अहिंसाची संपूर्ण जगाला आवश्यकता आहे. पुढील काळातील भविष्य जैन धर्माचे आहे. परंतु, आमच्या देशात जैन धर्मियांच्या पवित्र स्थानाची मोठी उपेक्षा केली जात आहे. अपमान होतो आहे. हा प्रकार चुकीचा असून निंदनीय आहे. जैन धर्मांच्या लोकांना संघटीत करुन तीर्थस्थळ टीकवण्यासाठी विरोध करु, असा इशारा जैन धर्मियांतील महिलांनी दिला. राजकारणासाठी जैन धर्मियांचा वापर केला जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. येथे पर्यटन स्थळ करण्याऐवजी हे ठिकाण धर्म स्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी महिलांनी केली.
पोलिसांकडून धरपकड जैन धर्मियांनी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान दरम्यान रॅली काढली. रस्त्यावर उतरुन सरकार विरोधात घोषणा दिल्या. आंदोलक मुख्य रस्त्यावर उतरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी यामुळे आंदोलकांची धरपकड केली. पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटापटही झाली.