ETV Bharat / state

Mumbai Crime News: नूडल्सचे आमिष दाखवून केले तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; 42 वर्षीय शेजाऱ्याला अटक - मुंबईत लैंगिक अत्याचार

भायखळा परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 42 वर्षीय शेजाऱ्याने तीन चिमुरड्या बहिणींवर नुडल्सचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी 42 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Mumbai Crime News
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण
author img

By

Published : Mar 1, 2023, 9:01 AM IST

मुंबई : दक्षिण मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या 3 मुलींना शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने नूडल्स आणि खाण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी बोलावले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित मुली या बहिणी आहेत. अल्पवयीन मुलींनी घडलेल्या प्रकाराबद्दल आईला सांगितल्यावर तिला मोठा धक्का बसला. त्यांनतर तिने जे जे मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर जे जे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलींच्या आईच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

खाण्यापिण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार : या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 376, 367 (ब), 341, 377 आणि पॉक्सो कलम 4, 5 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तीन मुलींना नूडल्स आणि खाण्यापिण्याचे आमिष दाखवून आरोपीने आपल्या घरी बोलावून दरवाजा बंद करून घेतला. जेणेकरून या मुली घरातून पळून जाऊ नये. त्यानंतर या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. घरी आल्यानंतर घडलेला प्रकार पीडित मुलींनी आईला सांगितला, असे पीडित मुलींच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

यापूर्वीची घटना : मुंबईतील बांगूर नगर लिंक रोड पोलिसांनी ओशिवरा येथे असलेल्या एका मुलींच्या वसतिगृहाच्या प्रिन्सिपल तथा पादरीला अटक केली होती. याप्रकरणी बांगुर नगर लिंक रोड पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीप्रमाणे, 15 फेब्रुवारीला पीडित 14 वर्षीय मुलीने वसतिगृहातून पळ काढला होता. वसतिगृहातील एका महिला सफाई कामगाराच्या घरी आश्रय घेतला होता. तेव्हा हे गंभीर प्रकरण उघडकीस आले होते. 16 फेब्रुवारीला सोनवणे पीडितेला बांगूर नगर लिंक रोड पोलिस ठाण्यात घेऊन गेले होते. सोनावणे यांनी पुढे सांगितले होते की, या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी जवळपास 10 तास मुलीची चौकशी केली होती.

हेही वाचा : Buldhana Crime: धक्कादायक! शिक्षकाने केले दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, बुलडाण्यातील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमधील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.