ETV Bharat / state

आयटीआय विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये रोजगाराच्या संधी - नवाब मलिक - job opportunities for ITI student

मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत आयटीसी हॉटेल सोबत आज (शनिवार) राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. याकरारामुळे आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे मलिक यांनी सांगितले आहे.

ITI students will now get jobs in five-star hotels
आयटीआय विद्यार्थ्यांनाही मिळणार आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम
author img

By

Published : Aug 21, 2021, 10:38 PM IST

मुंबई - कोरोना संकटामुळे रोजीरोटीवर गदा आली असताना राज्य सरकारने मात्र आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. असे मलिक यांनी सांगितले. मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत आयटीसी हॉटेल सोबत आज (शनिवार) राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुलुंड आयटीआय संस्थेच्याअंतर्गत डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच संगणक कार्यशाळेचे (आयटी लॅब) मंत्री मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, मियावाकी वृक्षारोपणाची पाहणी आणि वृक्षारोपणही करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. अ. म. जाधव, संस्थेचे उपप्राचार्य संदीप परदेशी, निरीक्षक अनिल सदाफुले यावेळी उपस्थित होते.

job opportunities for ITI student
कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक पाहणी करताना

'ऑन द जॉबची संधी मिळणार'

युवक-युवतींना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणेही गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक नामांकीत संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. मुलुंड आयटीआयमधील फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हिस असिस्टंट या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना आयटीसी हॉटेल लिमिटेडमार्फत सहा महिन्यांपर्यंत अद्ययावत असे ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे मलिक म्हणाले.

'विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा'

सामंजस्य करारावर मुलुंड आयटीआयचे प्राचार्य प्रदीप दुर्गे आणि आयटीसी हॉटेल लिमिटेडचे व्यवस्थापक (एचआर) धनंजय कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे मुलुंड आयटीआयमधील फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हिस असिस्टंट व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण प्राप्त होऊन हॉस्पिलीटी सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होणार आहे. ड्युएल सिस्टीम ट्रेनिंग पद्धतीअंतर्गत हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयमधील सैद्धांतिक प्रशिक्षणाबरोबरच औद्योगिक आस्थापना, कॉर्पोरेट तथा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची सुविधा प्राप्त होते. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी आयटीआयसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु असून इच्छूक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - नालासोपाऱ्यात भरदिवसा साक्षी ज्वेलर्स मालकाची लुटमार करून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.