ETV Bharat / state

Raj Thackeray : प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात आहे हे योग्य नाही, पंतप्रधानांनी लक्ष घालावे - राज ठाकरे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात (every project is going to Gujarat) आहे, हे योग्य नाही. पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली (Raj Thackeray on Project) आहे.

प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात आहे हे योग्य नाही

author img

By

Published : Oct 31, 2022, 1:07 PM IST

Updated : Oct 31, 2022, 1:51 PM IST

मुंबई - प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात (every project is going to Gujarat) आहे. हे योग्य नाही. पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान हे एका राज्याचे नाहीत. ते संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांनी समान संधी आणि प्रकल्प मिळतील यांची काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त (Raj Thackeray on Project) केली.

प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे

सरकारवर चौफेर टीका : 22,000 कोटी रुपयांची टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा नवा खेळ सुरू झाला आहे. हा प्रकल्प गमावल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर चौफेर टीका होताना दिसते. या वादात आता शिंदे फडणवीस सरकारचे नवे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उडी घेतली असून राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'पंतप्रधानांचा विचार हा विशाल असावा' अशी खोचक टीका राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी केली आहे.

पंतप्रधानपद हे देशाचे : सुरुवातीला महाराष्ट्राच्या वाट्याचे वेदांत फॉक्सकॉन, पल्क ट्रक पार्क असे प्रकल्प गुजरातला गेले. त्यातच आता टाटा एअर बस या भारतीय हवाई दलाची विमान बनवणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर थेट टीका केली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मागचे काही दिवस मी माध्यमांमध्ये बघतोय महाराष्ट्राच्या वाटेचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. बाहेर गेला म्हणजे गुजरातला गेला ना ? तुम्ही माझी या आधीची देखील भाषण काढून बघा. मी या आधी देखील म्हटलं होतं, आज देखील तेच म्हणेल, पंतप्रधानपद हे देशाच आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने संपूर्ण देशाचा विचार करायचा असतो. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला देशातील सर्व राज्य आपल्या मुलाप्रमाणे असली पाहिजेत. त्यात कोणताही भेदभाव नसावा. आता जर प्रकल्प आसामला गेला असला तर मला बरं वाटलं असतं. हा प्रकल्प गुजरातला गेला म्हणून आनंद होतोय किंवा फार वाईट वाटते असा विषय नाही. कारण, प्रकल्प देशातच आहे. पण, जे आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याचे आहे ते आपल्याला मिळत नाही त्याचं दुःख आहे.

इतर राज्यांचा देखील विकास करा : पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी या आधी देखील एक मुद्दा उपस्थित केला होता. जेव्हा याआधीचे दोन प्रकल्प गुजरातला गेले होते. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा प्रत्येक बहुउद्देशीय प्रकल्प जो तो प्रकल्प गुजरातला का जातो ? ते लोक त्यांच्या राज्याच्या गुजरातच्या विकासाचा मुद्दा नेहमीच घेऊन बसतात. मग मी जर महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर गेलो तर मग माझ्या भूमिकेबदल संकोच का आहे ? माझं स्पष्ट मत आहे असे प्रकल्प फक्त गुजरातमध्ये न जाता इतर राज्याच्या वाट्याला मिळाले तर त्यांचा देखील विकास होईल. आजही महाराष्ट्र उद्योग धंध्याच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे. गुजरातमध्ये फार चांगल्या सोयी आहेत असं काही नाही आहे, आपल्या राज्यात पण चांगल्या सोयी सुविधा आहेत. पण गुजरातचे अधिकारी असतील किंवा त्यातले नेते असतील हे इतर राज्यांचे प्रकल्प गुजरातला वळवण्यात यशस्वी होतात. अशी स्पष्ट प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

वादावरून थेट पंतप्रधानांवर टीका : दरम्यान, मागचे अनेक दिवस शिंदे फडणवीस सरकारचे नवीन मित्र म्हणून पुन्हा उभारी घेणाऱ्या राज ठाकरे यांनी या प्रकल्पांच्या वादावरून थेट पंतप्रधानांवर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे बोलवली आहे. यावेळी त्यांनी या प्रकल्पांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Last Updated : Oct 31, 2022, 1:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.