ETV Bharat / state

संजय राऊतांच्या 'त्या' ट्विटवर इस्रायलचा आक्षेप; राऊत म्हणाले यामागे नक्कीच राजकारण - गाझा

Israel Embassy letter to India On Sanjay Raut : संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबद्दल इस्रायलने कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडताना संताप व्यक्त केलाय. यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Israel Embassy letter to India On Sanjay Raut

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 2:32 PM IST

मुंबई Israel Embassy letter to India On Sanjay Raut : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हिटलरसंदर्भात केलेल्या ट्विटवर थेट इस्रायलनं आक्षेप घेतलाय. इस्रायलनं या विधानासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं नाराजी व्यक्त केलीय. इस्रायली दूतावासानं यहुदींसंदर्भात करण्यात आलेल्या चुकीच्या विधानावरुन परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही एक पत्र लिहिलंय. या पत्रात इस्रायली दुतावासानं ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची तक्रार केलीय. संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) प्लॅटफॉर्मवरुन यहुदींविरोधात एक पोस्ट केली होती.

काय होती राऊतांची पोस्ट : खासदार संजय राऊत यांनी 14 नोव्हेंबर रोजी गाझामधील रुग्णालयामधील 'गंभीर परिस्थिती'बद्दल भाष्य करताना X वर एक पोस्ट केली होती. हिंदीमध्ये पोस्ट करत संजय राऊत यांनी, "हिटलर ज्यू समाजाचा एवढा द्वेष का करत होता? हे आता तुम्हाला समजतं का?" असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. राऊत यांनी ही पोस्ट नंतर डिलीटही केली होती. मात्र तोपर्यंत इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. राऊत यांनी ही पोस्ट डिलीट करण्यापूर्वी ती 2,93,000 हून अधिक वेळा पाहण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलनं भारत सरकारला पाठवलेल्या ई-मेलमध्ये हा स्क्रीनशॉटही अटॅच केलाय.

राऊतांनी दिलं स्पष्टिकरण : या प्रकरणावरुन वातावरण तापत असताना संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, "ते ट्वीट करुन बराच वेळ झालाय. मी ते ट्वीट हटवलंही आहे. त्यामध्ये हिटलरचा संदर्भ होता. मात्र त्यातून इस्रायलला दुखावण्याचा माझा प्रयत्न नव्हता. ज्या पद्धतीनं हमासनं इस्रायलवर हल्ला केला त्यावर मी टीका केलीय. त्याच पद्धतीनं गाझामधील रुग्णालयांवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी अनेक बाळं आणि लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांना युद्धापासून दूर ठेवलं पाहिजे. हे माणुसकीला धरुन नाही. तुम्ही माणुसकी दाखवत नसल्यानं मी तसं म्हटलं होतं. या प्रकरणाच्या एका महिन्यानंतर इस्रायलच्या दूतावासानं पत्र लिहिलंय. नक्कीच त्यांना कोणी तरी संजय राऊतांना विरोध करण्यासाठी हे पत्र लिहा असं सांगितलं असेल" असं राऊतांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. संजय राऊत यांच्याकडून पुन्हा 'मकाऊ अस्त्र', व्हिडिओ शेअर करत भाजपाला दिला 'हा' इशारा
  2. 'फोटोवरुन भाजपाचीच हिट विकेट', संजय राऊत पुन्हा गरजले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.