ETV Bharat / state

कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या कामात गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घ्या - पालिका आयुक्त - iqbal singh chahal news

मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या कामात गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही सामावून घ्यावे, असे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

iqbal singh chahal
इकबाल सिंह चहल
author img

By

Published : Jun 19, 2020, 11:39 AM IST

मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. गृहनिर्माण सोसायट्यामधून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार झोपडपट्टी आणि चाळीत पोहोचल्यानंतर आता पुन्हा गृहनिर्माण सोसायट्यांकडे वळला आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या कामात गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही सामावून घ्या, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या मुख्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. या बैठकीला महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य शासनातील सहकारी गृहनिर्माण संस्थाविषयक संबंधित उपनिबंधक देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे बैठकीदरम्यान सांगितले.

'कोविड १९' या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रयत्न करित आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती आवश्यक आहे. पालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना नागरिकांकडून चांगला प्रतिसादही लाभत आहे. सुरुवातीला कोरोनाची लागण गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये झाली होती. त्यानंतर त्याचा प्रसार चाळी आणि झोपडपट्टीत झाला. आता कोरोनाने पुन्हा आपला मोर्चा गृहनिर्माण सोसायट्यांकडे वळवला आहे.

मुंबईत सध्या कोरोनाबधितांचा आकडा 62799 तर मृतांचा आकडा 3309 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 31856 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 27634 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्या असलेले 834 विभाग तर 5205 इमारतींमध्ये काही मजले तर काही विंग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील सोसायटींच्या पदाधिका-यांना सहभागी करून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.