ETV Bharat / state

गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करा; आयुक्तांचे निर्देश

Gokhale Bridge : गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

BMC
महानगरपालिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 10:58 PM IST

मुंबई Gokhale Bridge : अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकी दरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या, गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करावे. तसंच पुलाचा एक भाग सर्वसामान्य जनतेसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तांत्रिक बाबींमुळे या पुलाच्या कामांसाठी आतापर्यंत अतिरिक्त कालावधी लागला असला तरीही, आता पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावे, असे चहल यांनी सांगितलंय.

आज पार पडली बैठक : गोखले पुलाच्या कामाच्या प्रगतीबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पालिका मुख्यालयात आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. लोखंडी गर्डरची संपूर्ण जुळवणी २० नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण करून, रेल्वे भागावर सरकविण्याचं काम २ डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर लोखंडी गर्डर, उत्तर दिशेला १३ मीटर समतल पातळीवर सरकविण्यात आली. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या रस्ता रेषेमध्ये, आरसीसी आधारस्तंभावर लोखंडी गर्डर स्थानापन्न करण्यासाठी ७.८ मीटर उंचीवरुन खाली आणण्याचं काम १४ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण करण्यात आलं.

पुलाच्या कामाला वेग : स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या हे काम अत्यंत आव्हानात्मक, जोखमीचे आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिलेच अशा स्वरुपाचे काम होते. गोखले उड्डाणपूल हा भारतातील सर्वात जास्त उंचीवरून म्हणजे ७.८ मीटर उंचीवरून खाली उतरविण्यात येणारा पहिलाच पूल आहे. मुंबई महानगर कार्यक्षेत्रात अशाप्रकारच्या इतर ठिकाणच्या कामात साधारणत: १ ते दीड मीटर उंचीवरून पूल खाली उतरविण्याची आवश्यकता असते. सदर पुलाच्या बाबतीत जागेची कमतरता, रेल्वे भूभागासाठी एक आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी एक असे दोन विविध कंत्राटदार, दोन वेगळे तांत्रिक सल्लागार आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या परवानग्या आदी बाबींची जुळवाजुळव करणं गरजेचं होतं. हा सर्व समन्वय साधून पुलाच्या कामाला वेग देण्यात आला आहे.

लोखंडी तुळई रेल्वे भागावर सरकवणे : रेल्वे भागात ७.८ मीटर उंचीवरून गर्डर खाली उतरविणं हे अत्यंत जिकीरीचं आणि कसोटीचं काम होतं. म्हणूनच २ डिसेंबर २०२३ रोजी पुलाचं रेल्वे भागावर लॉचिंगचं काम झाल्यानंतर देखील, पश्चिम रेल्वे प्रशासन आणि तांत्रिक सल्लागार यांच्याकडून सर्व चाचण्या, परिक्षण यशस्वी पार पडल्यानंतरच पूल खाली उतरविण्याचं काम ३ जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आलं. हे सर्व केवळ अतिदक्षता आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून करण्या‍त आलं आहे. त्यामुळं सदर लोखंडी गर्डर रेल्वे भागावर सरकवणं आणि निर्धारित जागेवर आणण्यासाठी ७.८ मीटरनं उतरविणं ही कामे सर्व संबंधित यंत्रणांनी खूप काळजीपूर्वक केलेली आहेत. त्या‍मुळं गर्डर निर्धारित कालावधीत स्थानापन्न करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागला आहे. लवकरच हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचं या बैठकीत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. Gokhale Flyover: अंधेरीत गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम! पाच दिवसांत तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक
  2. अंधेरीतील दुर्घनटनाग्रस्त 'गोखले पुलाची' पुनर्बांधणी; पालिका करणार १३८ कोटींचा खर्च
  3. Andheri Gokhale bridge : अंधेरीतील गोखले पुल बंद, पुलाची एक लेन पालिका सहा महिन्यात सुरू करणार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.