ETV Bharat / state

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याला 15 वर्षांची शिक्षा - drugs trafficking

आयपीएस अधिकारी साजी मोहन सह एका पोलीस अधिकाऱ्यावर अमली पदार्थ तस्करी प्रकरणी नार्कोटिक्स सेल ब्युरोच्या कोर्टाकडुन शिक्षा सूनविण्यात आली आहे.  साजी मोहन यास 15 वर्षांची शिक्षा व 2 लाख रुपये दंड तर साजी मोहन याचा अंगरक्षक राजेश कुमार यास 10 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी साजी मोहन
author img

By

Published : Aug 19, 2019, 9:39 PM IST

मुंबई - अमली पदार्थ तस्करी प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी साजी मोहनसह एका पोलीस अधिकाऱ्यावर अमली पदार्थ तस्करी प्रकरणी नार्कोटिक्स सेल ब्युरोच्या कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. साजी मोहन यास 15 वर्षांची शिक्षा व 2 लाख रुपये दंड तर साजी मोहन याचा अंगरक्षक राजेश कुमार यास 10 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2009 साली महाराष्ट्र एटीएसकडून करण्यात आलेल्या कारवाईत आयपीएस अधिकारी साजी मोहनसह आणखी एका अधिकाऱ्याला हेरॉइन या अमली पदार्थाच्या तस्करी संदर्भात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केली.

कोण आहे साजी मोहन

साजी मोहन हा मूळचा केरळचा रहिवासी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले होते. जम्मू काश्मीर ही त्याची पहिली पोस्टिंग होती. या ठिकाणी त्याने पोलीस अक्षीक्षक म्हणून काम पाहिले होते. अफगाणिस्तानातून पाकिस्तान मार्गे काश्मीरमध्ये येणाऱ्या अमली पदार्थांच्या कारवाईत साजी मोहन हा त्याच्या अधिकारांचा वापर करीत जप्त केलेल्या अमली पदार्थांची जप्ती अर्धी दाखवत होता. उरलेले अमली पदार्थ मुंबई शहरात त्याच्या हस्तकांमार्फत विकत होता. महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईत साजी मोहन याच्याकडून तब्बल 47 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात 23 साक्षीदारांची साक्ष झाली. या दरम्यान साजी मोहन हा गेली 10 वर्षे तरुंगामध्ये आहे.

Intro:आयपीएस अधिकारी साजी मोहन सह एका पोलीस अधिकाऱ्यावर अमली पदार्थ तस्करी दरम्यान नार्कोटिक्स सेल ब्युरोच्या कोर्टाकडुन शिक्षा सूनविण्यात आली असून साजी मोहन यास 15 वर्षांची शिक्षा व 2 लाख रुपये दंड तर साजी मोहन याचा अंगरक्षक राजेश कुमार यास 10 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सूनविण्यात आली आहे.
Body:2009 साली महाराष्ट्र एटीएस कडून करण्यात आलेल्या कारवाईत आयपीएस अधिकारी साजी मोहन सह आणखीन एका अधिकाऱ्याला हेरॉइन या अमली पदार्थाच्या तस्करी संदर्भात अटक करन्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या मार्फत केली जात होती.
Conclusion:कोण आहे साजी मोहन

साजी मोहन हा मूळचा केरळचा रहिवासी असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याने यश मिळविले होते. जम्मू काश्मीर ही त्याची पहिली पोस्टिंग होती. या ठिकाणी त्याने एसपी म्हणून काम पाहिले होते. अफगाणिस्तानातून पाकिस्तान मार्गे काश्मीर मध्ये येणाऱ्या अमली पदार्थांच्या कारवाईत साजी मोहन हा त्याच्या अधिकारांचा वापर करीत जप्त केलेल्या अमली पदार्थांची जप्ती अर्धी दाखवत होता व उरलेलं अमली पदार्थ मुंबई शहरात त्याच्या हस्तकांमार्फत विकत होता. महाराष्ट्र एटीएस ने केलेल्या कारवाईत साजी मोहन याच्याकडून तब्बल 47 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात 23 साक्षीदारांची साक्ष झाली , या दरम्यान साजी मोहन हा गेली 10 वर्षे जेल मध्ये आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.