ETV Bharat / state

IPS Brijesh Singh: आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती, कोण आहेत 'हे' अधिकारी

author img

By

Published : Feb 20, 2023, 4:37 PM IST

आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीबाबतचे आदेश काढले आहेत.

IPS Brijesh Singh
आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह

मुंबई : आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. ब्रिजेश सिंह हे फडणवीस सरकारच्या काळात माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव व महासंचालक होते, आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सचिव म्हणून आले आहेत. भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तर विकास खारगे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव असून त्यांच्या सोबतीला मुख्यमंत्र्यांच्या टीममध्ये आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह आले आहेत. तर राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली.

कोण आहेत ब्रिजेश सिंह : १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सिंह हे फडणवीस यांच्या कार्यकाळातील सर्वात शक्तिशाली पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यानंतर ते माहिती व जनसंपर्क महासंचालक होते. थेट मुख्य सचिवांना अहवाल देत होते, शिवाय सायबर गुन्हे शाखेचे प्रभारी होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये जेव्हा फडणवीसांची सत्ता गेली आणि उद्धव ठाकरेंनी सत्ता हाती घेतली तेव्हा फडणवीसांच्या जवळच्या अनेक उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आले.

सिंह यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. अडीच वर्षांनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देवेन भारती यांची विशेष पोलिस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली. सिंह यांना सीएमओचे प्रधान सचिव म्हणून परत आणण्यात आले. सीएमओमध्ये सध्या अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी आणि प्रधान सचिव विकास खारगे यांचा समावेश आहे. ब्रिजेश सिंह सध्या गृहरक्षक दलाच्या अतिरिक्त महासंचालक पदी कार्यरत आहेत.

मित्रा संस्थेच्या सीईओपदी प्रवीण परदेशी : महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या राज्य सरकारच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते, अत्यंत प्रभावी आणि कार्य कुशल सनदी अधिकारी अशी त्यांची ओळख राहिली होती. मुंबई महापालिका आयुक्तपदावरून मे २०२० मध्ये त्यांची बदली करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी ते केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले होते, त्यानंतर ते निवृत्त झाले.

परदेशी पुन्हा नव्या भूमिकेत : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सात महिन्यांपूर्वी आल्यानंतर प्रविणसिंह परदेशी राज्य सरकारमध्ये पुन्हा नव्या भूमिकेत परततील, अशी अटकळ लावली होती. परंतु मित्रा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. राज्य सरकारने राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्यासाठी मित्रा या संस्थेची नोव्हेंबर२०२२ मध्ये स्थापना केली होती.

हेही वाचा: Mumbai Crime: 14 वर्षीय मुलीवर केले वारंवार अत्याचार; गर्ल्स हॉस्टेलच्या पादरीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.