ETV Bharat / state

IPL 2023 Guidelines : आयपीएल पाहायला जाताय, मग हे वाचाच... अनेक गोष्टींना नरेंद्र मोदी स्टेडियमवर घातली आहे बंदी..!

author img

By

Published : Mar 28, 2023, 3:57 PM IST

टाटा इंडियन्स प्रीमियर लीगचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना अनेक बंधने घालण्यात आहेत. प्रेक्षकांवर स्टेडियममध्ये येतानाच अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. जर तुम्ही सामना पाहणार असाल, तर या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Guidelines For Narendra Modi
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 साठी मार्गदर्शक तत्त्वे

मुंबई : टाटा इंडियन्स प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात 31 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने होणार आहे. आयपीएलच्या शुभारंभाच्या वेळी सामन्याला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2023 चा पहिला सामना शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. यादरम्यान सामना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमची मार्गदर्शक तत्त्वे : गुजरात टायटन्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पहिला सामना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी काही माहिती आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यांची लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अन्यथा त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. सामना पाहण्यासाठी येताना कोणतीही प्रतिबंधित वस्तू आणू नका. गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर करताना, सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमची मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. सामन्यादरम्यान अनेक बंदी असलेल्या गोष्टी आणू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी नियमावली : यामध्ये पॉवर बँक, सिगारेट लायटर, सेल्फी स्टिक, इतर कोणतीही लाठी किंवा काठी, कोणतीही धारदार वस्तू, काळा कागद, पाण्याची बाटली, फोटोग्राफी कॅमेरा, शस्त्रे आणि खाद्यपदार्थ तसेच हेल्मेट आणि नाणी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान प्रत्येकाने नाणीही सोबत आणू नयेत, अन्यथा बाहेर काढण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारे, नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या पहिल्या सामन्यादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे.

पहिला सामना होणार या संघात : पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, तर चार वेळा उपविजेते म्हणून अंतिम फेरीतही पोहोचले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे.

हेही वाचा : Gunaratna Sadavarte: बार कौन्सिल यांच्याकडून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई; 2 वर्षांसाठी केले निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.