मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेजारी राहणाऱ्या ( Sushant Singh Rajput's Neigbour ) एका ड्रग्स तस्कराला ( Drug Peddler ) अंमली पदार्थ विरोधी पथकाने ( NCB Arrested Sahil Shah ) शुक्रवारी अटक केली होती. साहिल शाह उर्फ फ्लाको (31) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स तस्कराचे नाव आहे. ( Drug Peddler Sahil Shah Arrested ) साहिल हा मागील काही महिन्यांपासून फरार होता. काल त्याने स्वतः एनसीबी कार्यालयात सरेंडर केल्यानंतर आज त्याला मुंबईतील किला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ( Drug Peddler Sahil Shah Sent to Judicial Custody ) यानंतर आर्थर रोड तुरुंगात रवानगी आली आहे.
दुबईतून आल्यावर केले आत्मसमर्पण -
सुशांत सिंह राजपूत याच्याशी संबंधित असणाऱ्या ड्रग्स केस प्रकरणी एनसीबी चौकशी करत होती. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या एक आरोपीने सुशांतच्या शेजाऱ्याचे नाव घेतले होते. एनसीबी त्याला अटक करण्यासाठी गेली असता साहिल शाह हा फरारी झाला होता. त्यानंतर आता दुबईतून आल्यावर त्यांना एनसीबी कार्यालयात येऊन आत्मसमर्पण केले आहे.
फ्लॅको हा इंटरनॅशनल ड्रग्स सिंडिकेटचा मास्टरमाईंड होता. त्याचे डी कंपनीशीही संबंध जोडले जात आहे. एनसीबीने अटक केलेल्या डी कंपनीच्या दानिश चिकना याच्याशीही तो संबंधित होता. आतापर्यंत पकडलेल्या सर्व ड्रग पेडलर्सनी एनसीबी चौकशीत सांगितले की, फ्लाको त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे जोडला जात असे. कोणीही त्याचा चेहरा पाहू शकत नव्हता, कारण तो अंधारात आपला चेहरा झाकत असे अशी माहिती तपासादरम्यान एनसीबीला देण्यात आली होती.