ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यातील कृषी पंपांना अखंडित वीज देण्यासाठी रोहित्र बसवा - ऊर्जामंत्री - Hingoli Power Development Works Meeting

बैठकीत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना व उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा राऊत यांनी आढावा घेतला. तसेच त्यांनी वसमत तालुक्यातील आरळ व हिंगोली तालुक्यातील कानरखेडा येथील उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
author img

By

Published : Sep 9, 2020, 5:59 PM IST

मुंबई - हिंगोली जिल्ह्यातील महावितरणच्या विविध योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विद्युत विकासकामांचा आढावा घेत शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी रोहित्रांची त्वरित पूर्तता करा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहे. हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण व महापारेषण मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बैठकीत दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना व उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा राऊत यांनी आढावा घेतला. तसेच त्यांनी वसमत तालुक्यातील आरळ व हिंगोली तालुक्यातील कानरखेडा येथील उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या. त्याचबरोबर, सांडस येथील उपकेंद्रांमध्ये ५ एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचेही निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंडित वीज प्राप्त व्हावी यादृष्टीने उच्च दाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेले दापी, देऊळगाव रामा तसेच बाराशिव उपकेंद्र उभारण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. तसेच, याबाबतचे नियोजन महावितरण व महापारेषण मधील अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी दिले.

पैनगंगा बॅरेजेसच्या विद्युतीकरणाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या सहायाने तयार करून सादर करण्याच्या सूचनाही याप्रसंगी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. हिंगोली जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा पुरेसा असल्याने कृषी पंपासाठी विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर, वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांनी मागणी केल्यानुसार शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वसमत येथे रोहित्र दुरुस्तीसाठी नवीन फिल्टर युनिट प्रस्तावित करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

दीनदयाळ योजनेंतर्गत बसवण्यात आलेल्या रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण खूप असून या रोहित्रांच्या गुणवत्तेची व संपूर्ण योजनेची चौकशी करणार असल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली. यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) दिनेश साबू, महापारेषणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे व इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा- ईटीव्ही इम्पॅक्ट: जेवण पुरवठा करणाऱ्या 'ओम साई सर्व्हिसेस'च्या गोदामावर अन्न व औषध विभागाचा छापा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.