मुंबई - स्कॉर्पियन क्लास आयएनएस वागीर या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले आहे. गुरुवारी संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जलावतरण झाले. या पाचव्या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढलेली असून या अगोदर भारतीय नौदलामध्ये आयएनएस कलवरी 2015 मध्ये सामील झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या चाचण्या पास करून ती 2017 मध्ये भारतीय नौदलामध्ये कार्यरत झाली आहे.
सहा पैकी 5 पाणबुड्या तयार- लवकरच सहावी पाणबुडी येईल
प्रोजेक्ट 75 अंतर्गत तब्बल 23000 कोटी रुपयांच्या निधीतून भारतीय नौदलासाठी सहा पाणबुड्या बांधल्या जात आहेत. रशियातून आलेली आयएनएस वागीर 1973 मध्ये नौदलात सामील झाल्यापासून 2001 पर्यंत कार्यरत होती. मात्र यानंतर या पाणबुडीला नौदलातून निवृत्त करण्यात आल्यानंतर आणखीन एका पाणबुडीची गरज असल्यामुळे प्रोजेक्ट अंतर्गत 6 पाणबुड्या बांधल्या जात होत्या.
माझगाव शिप बिल्डरकडून आलेल्या 2 पाणबुड्या सर्व चाचणीत पास -
या प्रोजेक्ट 75 च्या अंतर्गत आयएनएस कलवरी व आयएनएस खंदेरी या दोन्ही पाणबुडी भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत झाल्या आहेत. तर तिसरी पाणबुडी आयएनएस करंज ही चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तर चौथी पाणबुडी आयएनएस वेला ही समुद्रातील वेगवेगळ्या चाचणीसाठी सध्या पाठवण्यात आली आहे. आयएनएस वागीरची पाचवी पाणबुडी भारतीय नौदलाला देण्यात आलेली आहे. सहावी पाणबुडी वागीर लवकरच भारतीय नौदलाला देण्यात येईल असे माझगाव डॉककडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - केरळमध्ये कोविड रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय; शेवटच्या तासाला मतदान करू शकणार
पाणबुडीचे बांधकाम अत्यंत गुंतागुंतीचे -
आयएनएस वागीरचे बांधकाम गुंतागुंतीचे असल्याने यासाठी उच्च प्रतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ही पाणबुडी समुद्रातून हवेत, समुद्रातून जमिनीवर त्याचप्रमाणे समुद्रामध्ये गस्त घालताना गुप्त माहिती मिळवणे यासारख्या अनेक कारवाया करू शकते. लवकरच भारतीय नौदलाच्या सर्व चाचण्या पूर्ण करून ही पाणबुडी देशाच्या संरक्षणात कार्यरत होणार आहे.
हेही वाचा - 'दलाई लामांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा', 'या' माजी मुख्यमंत्र्यांनी केली मागणी