मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दादर येथील इंदू मिलमध्ये 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीचा प्रश्न मिटला आहे. महाराष्ट्र सरकारने भव्य असा 350 फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे.
गझियाबादच्या चित्र शाळेला भेट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे. या उद्देशाने तत्कालीन राज्य सरकारकडून पावले उचलली गेली. मात्र पुतळ्याच्या उंचीवरुन आंबेडकर अनुयायांनी प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले. या शिष्टमंडळाने गाझियाबाद येथे असलेल्या चित्रकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 25 फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या 25 फुटांच्या प्रतिकृतीप्रमाणे दादर येथील इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा उभारला जाणार आहे. राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, बाबासाहेबांच्या चळवळीतील अनुयायी आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर 350 फूट उंचीचा पुतळा उभारण्याबाबतचा निर्णय सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे.
आधी किती होती पुतळ्याची उंची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आकर्षण हे पुतळा असणार आहे. त्यात सुरुवातीच्या योजनेनुसार हा पुतळा 250 फुटांचा असणार होता. या पुतळ्याची उंची जमिनीपासूनची 106 मीटर असणार होती. त्यात 30 मीटरचा चौथरा असेल त्यावर 76.68 मीटरचा पुतळा उभारला जाणार होता. म्हणजेच पुतळ्याची उंची 250 फूट राहणार होती. त्यावर आनंदराज आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता. मूळ आराखड्यात डॉ. बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटांचा उभारण्यात येणार होता. मात्र त्याची उंची कमी करण्यात आल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला होता.
2025 मध्ये पूर्ण होणार स्मारक : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मारकाच्या ठिकाणाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पुतळ्याचे काम युद्ध पातळीवर करा, अशा सूचना कामगारांना दिल्या होत्या. त्यानंतर स्मारकांचे काम लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम 2025 सालातील मार्च एप्रिल महिन्यात पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा-
- 125 Feet statue of Dr Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंच पुतळा हैदराबादमध्ये उभारण्यात येणार
- Anandraj Ambedkar : इंदू मिलमधील स्मारकातील सुधारणाकडे सरकारचे दुर्लक्ष, आनंदराज आंबेडकर यांचा आंदोलनाचा इशारा
- Dr Babasaheb Ambedkar Memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे काम धीम्या गतीने