मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत कारागृहातील जवळपास 38 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्या कैद्यांवर उपचार सुरू आहेत.
2015पासून इंद्राणी मुखर्जी ही मुलगी शीना बोरा हत्या प्रकरणात भायखळा कारागृहात कैद आहे. भायखळा कारागृहामध्ये ज्या 38 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना भायखळा इथल्या एका शाळेमध्ये कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. या सगळ्या कैद्यांवर उपचार सुरू आहेत.