मुंबई - देशातील लॉकडाऊनमुळे रेल्वेच्या एटीव्हीएम स्मार्ट कार्डची वैधता आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे मोठया प्रमाणात एटीव्हीएम स्मार्ट कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे.
देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून काहींचे एटीव्हीएम कार्डची वैधता 22 मार्च, तर काहींचे 30 जून ला संपणार आहे. या स्मार्ट कार्ड एटीव्हीएम धारकांची वैधता 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. यामुळे अनेकांचे वाया जाणारे पैसे वाचणार असून या निर्णयाचा लाभ स्मार्ट एटीव्हीएम कार्डधारकांनी घ्यावा, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.