ETV Bharat / state

भारत पेट्रोलियम पुरवणार मुंबईला प्रतिदिन १० ते १५ मेट्रिक टन ऑक्सिजन

author img

By

Published : Aug 27, 2021, 11:20 AM IST

मुंबई महापालिकेच्या माहुल येथील मैदानावर वैद्यकीय ऑक्सिजन जम्बो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबई रिफायनरीने दीड किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली आहे. सुमारे ४ कोटी रुपयांची यंत्रे दान स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहेत.

Mumbai
Mumbai

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या माहुल येथील मैदानावर वैद्यकीय ऑक्सिजन जम्बो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) मुंबई रिफायनरीने दीड किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली आहे. सुमारे ४ कोटी रुपयांची यंत्रे दान स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहेत. याद्वारे भारत पेट्रोलियम पालिकेला दररोज १० ते १५ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.

असा असेल प्रकल्प -

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहूल रस्त्यावर महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय ऑक्सिजन जम्बो सिलेंडर पुनर्भरण (Medical Grade Oxygen Cylinder Bottling Facility) प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी महानगरपालिकेने २ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ स्कीड इत्यादी यंत्रणा खरेदी करुन प्रकल्प उभारणी सुरु केली आहे. त्यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी हातभार म्हणून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) मुंबई रिफायनरीने देखील यंत्रे दान स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये १ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, १ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी यंत्रांचा समावेश आहे. त्यासोबत बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पापासून महानगरपालिकेच्या जंबो सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पापर्यंत सुमारे दीड किलोमीटर लांबीची ऑक्सिजन पाईपलाईन देखील बीपीसीएलने टाकली आहे. यंत्रे व ही ऑक्सिजनची वाहिनी मिळून सुमारे ४ कोटी रुपयांचा हातभार बीपीसीएलने लावला आहे.

१० ते १५ मेट्रिक टन ऑक्सिजन -

बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या माहुलमधील वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पामध्ये प्रतिदिन सुमारे ७२ मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती होते. यापैकी प्रतिदिन सुमारे १० ते १५ मेट्रिक टन इतका वैद्यकीय ऑक्सिजन महानगरपालिकेच्या माहूलमधील ऑक्सिजन सिलेंडर भरण्याच्या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. या सिलेंडर भरण्याच्या प्रकल्पामध्ये ७ घनमीटर क्षमतेचे सुमारे ६० सिलेंडर एका तासात भरता येतात. या हिशेबाने ८ तासांच्या एका सत्रामध्ये किमान ५०० जंबो सिलेंडर भरता येऊ शकतात. त्यासाठी ५ मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता असेल. म्हणजेच २४ तासांच्या तीन सत्रात १५ मेट्रिक टन प्राणवायूद्वारे एकूण १ हजार ५०० जंबो सिलेंडर भरले जावू शकतात. बीपीसीएल मुंबई रिफायनरीने उपलब्ध करुन दिलेली यंत्रे प्राप्त होताच त्यांच्या उभारणीची कार्यवाही देखील महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुरक्षाविषयक पूर्तता असल्याचे पेसो प्रमाणपत्र (PESO Certification) प्राप्त होताच हा प्रकल्प कार्यरत होणार आहे.

मोलाचा प्रकल्प -

कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या कालावधीत कोविड रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भासते. यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. माहुल येथील वैद्यकीय ऑक्सिजन जम्बो सिलिंडर भरण्याचा प्रकल्प त्यादृष्टिने मोलाचा ठरणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

हेही वाचा - सुनील केदारांविरोधात आशिष देशमुखांचे शड्डू; सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.