ETV Bharat / state

'इंडिया' आघाडीची चौथी बैठक आज दिल्लीमध्ये, उद्धव ठाकरे, शरद पवार होणार सहभागी - आरजेडी प्रमुख लालू प्रसाद

India Aghadi Meeting : 'इंडिया' आघाडीची आज दिल्लीत बैठक पार पडत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी होणार आहेत.

India Aghadi Meeting
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 11:17 AM IST

Updated : Dec 19, 2023, 11:25 AM IST

मुंबई India Aghadi Meeting : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर 15 दिवसांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांची आघाडी म्हणजेच 'इंडिया आघाडी'ची चौथी बैठक दिल्ली इथं आज होणार आहे. इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटणा इथं झाली होती. त्यानंतर बंगळुरू आणि मुंबई इंथं आघाडीच्या बैठका झाल्या. दिल्लीत होणाऱ्या बैठकीच्या एक दिवस आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (उबाठा गट ), आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, जेडीयू नेते नितीश कुमार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचले आहेत. सोमवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट : सोमवारी संध्याकाळी आपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह इतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर केजरीवाल यांनीही सौजन्य भेटीदरम्यान देशातील 'राजकीय समस्यां'वर चर्चा झाली, असं सांगितलं. या नेत्यांमध्ये केजरीवाल यांच्या निवासस्थानी 45 मिनिटे चर्चा झाली.

'इंडिया' आघाडीची आज बैठक : मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता बैठक सुरू होणार असून, यामध्ये 28 पक्षांचे प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचा समावेश असेल. बैठकीच्या माध्यमातून विरोधी पक्षांना पुन्हा एकदा एकजूट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत सपा-काँग्रेस आणि इतर पक्ष आमनेसामने दिसले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या बैठकीत जागावाटपाच्या आणि किमान समान कार्यप्रणालीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच असं मानलं जातं आहे की इंडिया आघाडी जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत लोकसभा उमेदवारांची नावं जाहीर करू शकते. आघाडीच्या पक्षांनी आधीच स्पष्ट केले आहे की जागावाटप सुनिश्चित करण्यासाठी राज्यांमध्ये उपसमित्यांची स्थापना केली जाईल.

हेही वाचा :

  1. "ज्यांनी अदानींची सुपारी घेतली, त्यांना ठेचून टाकू", उद्धव ठाकरेंचा धारावी बचाव आंदोलनात इशारा
  2. ...त्यामुळं ठाकरेंच्या सत्तेचं 'लंका'दहन, ठाकरे सरकार पाडण्यात माझा वाटा - मुख्यमंत्री शिंदे
  3. काही लोकं दुसरी साफसफाई करत होते', नाव नं घेता मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Last Updated : Dec 19, 2023, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.