ETV Bharat / state

अनलॉकमध्ये मुंबईच्या ध्वनी प्रदूषणात वाढ - Mumbai Latest News

लॉकडाऊनमुळे मुंबईतील ध्वनी प्रदूषण बऱ्यापैकी कमी झाले होते, मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून, वाहतूक वाढल्याने मुंबईतील ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Increase in noise pollution Mumbai
अनलॉकमध्ये मुंबईच्या ध्वनी प्रदूषणात वाढ
author img

By

Published : Dec 30, 2020, 3:42 PM IST

मुंबई - मुंबई, राज्याची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी. कधी न थांबणारी, वेगात पुढे जाणारी, दिवस रात्र आवाज करणारी मुंबई. पण ही मुंबई कधी नव्हे ती कोरोनामुळे शांत झाली. मार्चमध्ये देशात पहिले लॉकडाऊन सुरू झाले आणि मुंबईही शांत झाली. मुंबईत मोठ्या प्रमाणावर होणारे ध्वनी प्रदूषण लॉकडाऊनमध्ये कमी होऊ लागले. लॉकडाऊन 3 मध्ये तर ध्वनी प्रदूषण खूपच कमी झाले. पण पुढे मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि मग मुंबईचा आवाज ही वाढू लागला. त्यामुळेच डिसेंबर 2020 मध्ये 64 डीबी ते 95.6 अशी मार्च ते डिसेंबर 2020 दरम्यानची सर्वाधिक आवाजाची पातळी नोंदवली गेली आहे.

मुंबईत मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. तर मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत ध्वनी प्रदूषण हा गंभीर विषय बनल्याचे चित्र आहे. 100 डीबीच्या वर मुंबईत आवाजाच्या पातळीची नोंद बऱ्याचदा होते. आवाज फाउंडेशनसारखी संस्था या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहे. दरम्यान लॉकडाऊन आधीच्या ध्वनी प्रदूषणाचा विचार केला तर जानेवारी ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 65 डीबी ते 105 डीबी अशी मुंबईतील आवाजाची पातळी होती. म्हणजे या काळात ध्वनी प्रदूषण बऱ्यापैकी होते.

लॉकडाऊनमुळे आवाजाच्या पातळीत घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 22 मार्चपासून लॉकडाऊन लागले. रेल्वे, मेट्रो, मोनो, टॅक्सी-रिक्षा, शाळा-कॉलेज, कार्यालये सगळं काही बंद झाले. कधी नव्हे ते मुंबईतील सर्व रस्ते शांत होते. अत्यावश्यक सेवेसाठीच वाहतूक आणि इतर बाबी खुल्या होत्या. त्यामुळेच लॉकडाऊन 1 मध्ये (मार्च-एप्रिल) 41.7 डीबी ते 66 डीबी इतकी आवाजाची पातळी नोंदवली गेली. लॉकडाऊन 2 मध्ये ( एप्रिल-मे) 52.9डीबी ते 63.4 डीबी आवाजाची पातळी होती. तर लॉकडाऊन 3 आणिन 4 मध्ये (मे) 52 डीबी ते 56.4 डीबी आवाज नोंदवला गेला. ही आकडेवारी खूपच दिलासादायक होती. मुंबईतील ध्वनी प्रदूषण कधी नव्हे ते इतके कमी झाले होते. अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलाली यांनी दिली आहे.

अनलॉकमध्ये ध्वनी प्रदूषण वाढले

लॉकडाऊमध्ये मुंबईतील आवाजाची पातळी खाली आली खरी, पण अनलॉकमध्ये पुन्हा मुंबईचा आवाज वाढू लागला आहे. त्यामुळे अनलॉक 1 मध्ये अर्थात मे आणि जूनमध्ये मुंबईतील आवाजाची पातळी 52. 9 डीबी तो एकूण 90.8 डी बी इतकी नोंदवली गेली. अनलॉक दोन(जुलै) मध्ये आवाजाच्या पातळीत वाढ झाली. अनलॉक 2 मध्ये 58.0 डीबी ते 89.5 डीपी इतका आवाज नोंदवला गेला. तर अनलॉक तीन मध्येही मुंबईत ध्वनि प्रदूषण वाढतच राहिले. अनलॉक 3 अर्थात ऑगस्टमध्ये 60.3 डीबी ते 81.8 डीबी इतके ध्वनि प्रदूषण वाढले, अनलॉक 4 अर्थात सप्टेंबर मध्ये 64. डीबी ते 90.5 डीबी, अनलॉक 5 मध्ये (ऑक्टोबर ) 64.2 डीबी ते 94.8 डीबी, अनलॉक 6 मध्ये (नोव्हेंबर) 66.1 डीबी ते 92 डीबी आणि अनलॉक 7 मध्ये 64.6डीबी ते 95.6 डीबी इतकी प्रचंड आवाजाच्या पातळीत वाढ झाली.

वाहनांमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ

मुंबईत सर्वाधिक वाहने असून वाहनांची वर्दळ ही मोठी असते. त्यामुळेच मुंबईतील ध्वनी प्रदूषणाचा विषय जेव्हा येतो तेव्हा वाहनांमुळे येथील आवाजाची पातळी अधिक वाढते असते. अगदी 'निरी'च्या 2018च्या अहवालातही ही बाब नोंदवण्यात आली आहे. त्यामुळेच लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठीची वाहतूक सेवा वगळता इतर सेवा बंद असताना ध्वनी प्रदूषण खूपच कमी झाले होते. आता वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने ध्वनी प्रदूषण पुन्हा वाढले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.